पुणे :
अखिल धनगर समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार दि. 23 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत श्री. मारुती भैरवनाथ मंदिर देवस्थान (ट्रस्ट), कर्वेनगर, वडाचा स्टॉप, पुणे ५२ येथे आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये 10 वी व 12 वी व पदवीधर उत्त्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ तसेच पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतोले (महाराष्ट्र प्रदेश महासचिव, रासप) यांनी ही माहिती दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. मेधा कुलकर्णी (आमदार, कोथरूड विधानसभा मतदार संघ), भिमराव तापकीर (आमदार, खडकवासला, विधानसभा मतदारसंघ) आहेत. ‘अखिल धनगर समाज महासंघा’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आणि विष्णुपंत चव्हाण (महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते रासप) तर मार्गदर्शक निलेश निढाळकर (पुणे शहर संपर्कप्रमुख रासप) यांचे स्पर्धा परिक्षार्थींसाठी मार्गदर्शनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपक मानकर (उपमहापौर), अशोक हरणावळ (शिवसेना गटनेते), शाम देशपांडे (शिवसेना पुणे शहर संघटक), आप्पासाहेब आखाडे (अध्यक्ष, वि. ध. ए. परिषद), सागर गोरे (आधारस्तंभ, युवा नेते रासप), घन:श्यामबापू हाके (अध्यक्ष, धनगर यु. संघ, महा.), दिनेश बराटे (शिवसैनिक), राजाभाऊ बराटे (नगरसेवक पुणे मनपा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत.
या कार्यक्रमात संजय सोनावणी (ज्येष्ठ साहित्यिक), श्रद्धा भातांब्रेकर (म. प्र. म. अध्यक्षा रासप), किशोर शिंदे (नगरसेवक पुणे मनपा), अनिल राणे (नगरसेवक), भाग्यश्री दांगट (नगरसेविका), किरण बारटक्के (उपाध्यक्ष, भाजप), अश्विनी जाधव (नगरसेविका), दत्ता बहिरट (नगरसेवक), प्रशांत बधे (नगरसेवक), प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ (मा. अध्यक्ष शिं. मं.), सुरेखा मकवान (नगरसेविका), रामचंद्र ऊर्फ चंदू कदम (नगरसेवक), लक्ष्मी दुधाणे (नगरसेविक), बाळासाहेब कोकरे (महाराष्ट्र प्रदेश सदस्य, रासप), देवेंद्र धायगुडे (अध्यक्ष, पुणे शहर रासप), मधुकर वैद्य (उपाध्यक्ष, पुणे शहर रासप), अरुण कोळेकर (सामाजिक कार्यकर्ते), धनंजय झुरुंगे (अध्यक्ष वसुंधरा मित्र परिवार) उपस्थित राहणार आहेत


