पंजाबमधील अमृतसर येथील अकाल तख्तचे प्रमुख ( जथेजा )गुरुबच्चन सिंग पुणे भेटीस आले . सकाळी रेसकोर्सजवळील गुरुद्रारा गुरुनानक दरबार येथे त्यांचे कथावाचन झाले . यावेळी त्यांनी सरोफा , कृपाल देऊन गुरुद्वाराचे अध्यक्ष हरमिंदरसिंग घई यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . यावेळी गुरुद्रारा गुरुनानक दरबार सरचिटणीस चरणजितसिंग सहानी , उपाध्यक्ष करमतजीतसिंग आनंद , शेष सचिव कुलदीपसिंग चौधरी , बिल्डिंग कमिटीचे चेअरमन संतसिंग मोखा , सहसचिव विकी ऑबेराय दलजितसिंग रेंक ,गुरुमितसिंग रत्तू ,ग्यानी अमरजीत सिंग , ग्यानी हरभजन सिंग व शीख धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शीख धर्मीयांनी गुरुग्रंथ साहेब या आपल्या ग्रंथाला मानले पाहिजे , तरुणानी जास्तीत जास्त गुरुद्वारात आले पाहिजे . पंजाबमध्ये नशाबंदी अभियान सुरु केले आहे . प्रत्येक माणसाने देवाचे नाव (सिमरन ) गुरुचे नाव घेतले पाहिजे . जे सेवा करतात त्यांना परमात्म्याची नक्कीच प्राप्ती होईल . आपण सर्वांनी धर्मग्रंथातील भावना समजून घेतल्या पाहिजेत . आपण सर्वांनी आतून मनाने जोडले गेले पाहिजो , परंतु आपण बाहेरून जोडले जात आहोत . त्यासाठी सर्वांनी आत मधून जोडले गेले पाहिजे. आपण सर्व परमेश्वराला एक झाले पाहिजे . अकाल तख्त समाजात प्रभोधनात्मक कार्यक्रम राबवीत आहेत . त्यामध्ये नशा बंदी अभियान राबवीत असून गरजूंना आरोग्य सुविधा मोफत देण्याचे काम करीत आहेत . असे अकाल तख्तचे प्रमुख ( जथेजा )गुरुबच्चन सिंग यांनी आपल्या गुरुवाणी मध्ये सांगितले .
अकाल तख्तचे प्रमुख ( जथेजा )गुरुबच्चन सिंग यांनी गणेश पेठ गुरुसिंग सभा गुरुद्वारा, येरवडा येथील दशमेश दरबार आदी गुरुद्वाराना भेटी दिल्या .