… यांना संधी तरी किती वर्षे देणार ? २० वर्षे भाजपने कसब्यात प्रतिनिधित्व करून कोणत्या योजना राबविल्या ? कोणता महत्वाकांक्षी प्रकल्प कसब्यात राबविला ? सामान्य जनता हाच प्रश्न स्वतःला विचारात आहे उत्तर शोधत आहे । आणि … आता बास्स … आता काही करण्याची इच्छया असणाऱ्या , धडपडी व्यक्तिमत्वाला संधी देवू यात , चमकुगिरी करीत नेते बनत मंत्रिपदाच्या शर्यतीत जावू पाहणाऱ्या प्रतिनिधींनी आजतागायत इथल्या सामान्य माणसाच्या पदरात काय टाकले ? मतदारसंघाला काय दिले ? अशा प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कसब्याची निवडणूक होईल आणि मतदान होईल . त्यामुळे हि निवडणूक आता पंचरंगी उरली नाही तर दुरंगी होईल , माझी लढत थेट भाजपशी -विद्यमान आमदारांशीच होईल आणि मला हमखास विजय मिळेल असे वक्तव्य येथे कसबा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी चे उमेदवार दीपक मानकर यांनी केले आहे
ते म्हणाले ,राजकारणापेक्षा समाजकारण करणारा व सामान्य व्यक्तीच्या अडीअडचणींमध्ये पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा भाऊ., ही आपली सामान्यत: ओळख असून, समाजातील दिनदुबळ्यांना न्याय देणे व सेवा करणे हेच आपण केले आहे.या समाजकारणाद्वारे गेली ३० वर्षे समाजातील वंचित – मध्यमवर्गीय आणि सर्व स्तरावरील नागरिकांशी जोडला गेलेला ऋणानुबंध या निवडणुकीत माझ्यासाठी पुढे येतो आहे तोच मला विजयापर्यंत पोहोचवेल याची मला खात्री आहे
दीपक मानकर यांनी सारसबाग, महाराणा उद्यान येथे भल्या पहाटे जाऊन ज्येष्ठांशी प्रत्यक्ष संवाद साधला. सारसबाग येथील गणपती मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन ज्येष्ठांच्या गाठी-भेटी घेतल्या व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.राष्ट्रवादी पक्षाने स्व. डॉ. दिलीप घुले यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांची सनद व त्यातील धोरणांबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी सारसबाग मित्रमंडळ अध्यक्ष एन. डी. पाटील व उपाध्यक्ष शिवाजी भागवत, संजय नाईक, गेल्डा सर, दीपक जगताप, बाळासाहेब राठोड आदी उपस्थित होते.
लढत भाजपशीच – दीपक मानकर
Date: