Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महापौर ,उप महापौर ,स्थायी समिती अध्यक्षांचा मुस्लिम बॅंकेतर्फे सत्कार — सामाजिक सलोख्यातून पुण्याचा लौकिक वाढविणार :प्रशांत जगताप

Date:

पुणे :
‘  सर्व धर्मियांचा  ,विचारधारांचा सन्मान करणारे शहर या रुपात लहानपणापासून पुण्याला पाहत आलेला असल्याने कॉस्मोपोलिटन पुण्यातील सामाजिक सलोखा राखणे आणि सर्वांच्या समन्वयाने पुण्याच्या स्मार्ट लौकिकात भर घालण्याला माझे प्राधान्य राहील ‘ अशी ग्वाही शनिवारी महापौर प्रशांत जगताप यांनी दिली .
दि मुस्लिम को ओपरेटीव्ह बँक तर्फे आयोजित नवनियुक्त पालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड पदाधिकारयांचा सत्कार समारंभात ते बोलत होते . कॅम्प परिसरातील बँक मुख्यालयात हा कार्यक्रम झाला
बँकेचे अध्यक्ष पी ए इनामदार यांच्या  आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्ते महापौर प्रशांत जगताप ,उप महापौर मुकारी अलगुडे ,स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष दिलीप गिरमकर ,नगरसेवक फारूक इनामदार यांचा सत्कार करण्यात आला . त्यावेळी महापौर बोलत होते .
ते म्हणाले ,’ वानवडी सारख्या कॉस्मोपोलिटन प्रभागातून मी निवडून आल्याने मला सर्व धर्मियांशी मिळून मिसळून राहण्याची सवय आहे . महापौर पदी नियुक्ती होताना हा घटक महत्वाचा ठरला . सर्व धर्म ,पंथ ,समुदायांचे सण ,त्यातील सलोखा हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे . कॉस्मोपोलिटन पुण्यातील सामाजिक सलोखा राखणे आणि सर्वांच्या समन्वयाने पुण्याच्या स्मार्ट लौकिकात भर घालण्याला माझे प्राधान्य राहील ‘
पी ए इनामदार म्हणाले ,’ पुण्याची प्रतिमा देशातील पुरोगामी आणि सलोखा राखणारे ,त्यातून प्रगती करणारे शहर अशी आहे . ही प्रतिमा उंचावण्याचे कार्य सर्व पदाधिरयानी करावे . प्रत्येकाचा धर्म घरापुरता मर्यादित राहील आणि सार्वजनिक कार्यात राज्यघटनेचा आदर्श राहील असेच वातावरण पुढील काळात अपेक्षित आहे . ‘
मुकारी अलगुडे ,बाळासाहेब बोडके ,दिलीप गिरमकर यांनीही मनोगत व्यक्त केले .
अझीम गुडाकूवाला यांनी प्रास्ताविक केले . यावेळी  बँकेचे संचालक -कर्मचारी वर्ग  , बँकेचे सचिव जंगबहादूर मंद्रूपकर,  नगरसेवक महेंद्र पठारे ,अयुब शेख ,एस ए इनामदार ,इक्बाल शेख ,कासम शेख ,लुकमान खान ,तस्लीम खान   इत्यादी उपस्थित होते
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...

साक्षीभावात राहिल्यास जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी : अभयकुमार सरदार

‌‘निसर्गातील कार्यक्षमता‌’ विषयावर अनोखे चित्रप्रदर्शन पुणे : साक्षीभाव साध्य झाल्यास...