पुणे :
भिडे पुलाजवळील नदी पात्रातील जॉगिंग ट्रॅकचे काम थांबवावे अशी मागणी करणारे पत्र खासदार ऍड.वंदना चव्हाण यांनी आज महापौर दत्तात्रय धनकवडे आणि पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार दिले.
“नदीपात्रात नदीची वहनक्षमता कमी होईल असे कोणत्याही स्वरूपाचे पक्के बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित लवादाने पुर्णत: मनाई केली आहे. असे असताना महानगरपालिकेने हे जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम करणे पुर्णत: अवैध आहे.’ असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. हे जॉगिंग ट्रॅकचे बांधकाम करण्यासाठी संबंधित खात्याची महापालिकाने परवानगी घेतली आहे का? याबाबत खुलासा देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
“सध्या तेथे सुरू असलेले काम तत्काळ थांबवावे, अन्यथा महापालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबत दाद मागण्यात येणार’ असल्याचेही त्यात म्हणले आहेे.