पुण्यातून ‘डायल 108’सेवेच्या 20 रूग्णवाहिका नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी रवाना

Date:

unnamed1
पुणे :
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या 20 रूग्णवाहिका पुणे जिल्ह्यातून रवाना करण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकांमध्ये 5 रूग्णवाहिका ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ (अङड), 15 रूग्णवाहिका ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ आहेत. तसेच रूग्णवाहिकांमधून 20 डॉक्टर्स आणि वाहनचालकांची टिम रवाना झाली आहे,  अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके यांनी दिली.
कुंभमेळ्यामध्ये ‘डायल 108’ सेवेद्वारे आत्तापर्यंत 165 रूग्णांना आपत्कालीन मदत तर 5331 रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, ‘डायल 108’ सेवेच्या एकूण 30 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, त्यापैकी 12 त्रंबकेश्‍वर येथे तर नाशिक येथे 18 रूग्णवाहिका 24 तास सेवेसाठी राहणार आहेत.
नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये 1 कोटीहून अधिक भाविक येतात त्यामुळे मोठ्याप्रमाणात चेंगराचेंगरी किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्राण वाचविण्याच्या ‘गोल्डन अवर्स’मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठी ‘डायल 108’च्या रुग्णवाहिका कुंभमेळ्यामध्ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत राहणार आहेत.  अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे जिल्हा व्ययस्थापक डॉ. गजानन पुराणिक यांनी दिली.
कुंभमेळ्यासाठी कार्यरत वाहनचालक, डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी, शासकिय सेवेतील डॉक्टर्स, प्रायव्हेट डॉक्टर्स आणि इतर प्रतिनिधी यासर्वांना ‘गोल्डन अवर्स’मध्ये तातडीचे उपचार देण्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे:महापलिकेच्या मुख्यसभेसमोर अहवाल ठेवा:निलेश निकम

पुणे- PMPML मधील बेकायदेशीर पदोन्नती,नोकरभरती व घोटाळे याबाबतचा अहवाल...

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने संचालक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी उत्तराधिकाराची घोषणा केली

पुणे-१० मार्च २६ : किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (KOEL) ने आज जाहीर केले की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष  अतुल किर्लोस्कर हे 70 वर्षांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा पूर्ण केल्यामुळे 31 मार्च 2026 रोजी (कार्यालयीन वेळ संपल्यानंतर) आपल्या पदावरून निवृत्त होतील. श्री. किर्लोस्कर हे गेल्या ४३ हून अधिक वर्षांपासून KOEL सोबत कार्यकारी आणि गैरकार्यकारी अशा विविध भूमिकांमध्ये कार्यरत होते. त्यांनी १९८३ मध्ये कंपनीत प्रवेश केला. नोव्हेंबर १९८४ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL (आता किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड KIL म्हणून ओळखली जाते) मध्ये एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट १९८५ मध्ये त्यांची संचालक मंडळावर सहनियुक्ती (coopted) करण्यात आली आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९८८ मध्ये त्यांची तत्कालीन KOEL चे उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी हे पद जुलै १९९८ पर्यंत भूषवले. त्यानंतर त्यांची तत्कालीन KOEL च्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून निवड झाली. वर्षानुवर्षे श्री. किर्लोस्कर यांनी कार्यकारी तसेच गैर-कार्यकारी भूमिकांमध्ये संचालक मंडळाच्या विविध समित्यांवर सेवा दिली आहे. जानेवारी २००९ मध्ये प्रस्तावित डिमर्जरनंतर श्री. किर्लोस्कर यांची KOEL च्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. हा डिमर्जर मार्च २०१० मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी ३१ मार्च २०१० ते २५ जानेवारी २०१२ या कालावधीत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्य केले. जानेवारी २०१२ ते मार्च २०२३ या कालावधीत श्री. किर्लोस्कर यांनी कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून काम पाहिले आणि त्यानंतर त्यांनी कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि चेअरमन म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवली. संचालक मंडळाने कंपनीसाठी श्री. किर्लोस्कर यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि आभार व्यक्त केले. कंपनीच्या उत्तराधिकार नियोजन (Succession Planning) प्रक्रियेचा एक भाग म्हणून पुढील बदल नियोजित करण्यात आले आहेत. संचालक मंडळाने कंपनीचे विद्यमान नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. राहुल किर्लोस्कर यांची चेअरपर्सन म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, संचालक मंडळाने कंपनीच्या विद्यमान मॅनेजिंग डायरेक्टर सुश्री गौरी किर्लोस्कर यांची त्यांच्या सध्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदाच्या जबाबदारीसह व्हाइस चेअरपर्सन म्हणूनही नियुक्ती केली आहे. श्री. अतुल किर्लोस्कर म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून KOEL च्या प्रवासाचा भाग होणे माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची बाब राहिली आहे. मागील काही वर्षांपासून आम्ही या संक्रमणावर नियोजित उत्तराधिकार म्हणून काम करत होतो. माझ्या मते, वेळेवर आणि सुयोग्य नियोजनासह केलेला उत्तराधिकार हा कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. तसेच, नवीन नेतृत्वाला त्यांच्या दृष्टीकोन आणि योजनांनुसार कंपनीला पुढे नेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मिळणेही तितकेच आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, मी कंपनीच्या संचालक मंडळावरील आणि इतर सर्व पदांवरून पूर्णपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल आणि गौरी यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की KOEL ला नव्या उंचीवर नेण्यासाठी आमच्याकडे योग्य टीम आहे.” श्री. राहुल किर्लोस्कर म्हणाले, ”गेल्या अनेक वर्षांत कंपनीसाठी दिलेल्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल मी अतुल यांचे आभार मानतो. या भूमिकेत पाऊल ठेवताना, अतुल यांच्या नेतृत्वाखाली कंपनीत झालेले उत्कृष्ट कार्य पुढे नेण्याचा माझा उद्देश आहे. कंपनीला तिच्या उद्दिष्टांच्या दिशेने पुढे नेण्यासाठी गौरी आणि व्यवस्थापन टीमसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.”

14 वर्षांच्या मुलींसाठी देशव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध उपाययोजना 17 फेब्रुवारी 2026 पर्यंत 8.73 कोटी...