स्पाइन सर्जन च्या २८ व्या अखिल भारतीय वार्षिक परिषदेचे उद्घाटन
पुणे :
प्रगत संशोधनाचे युग अवतरले असल्याने आरोग्याच्या क्षेत्रातही अत्याधुनिक ,उत्कृष्ट तरीही सर्वाना परवडणाऱ्या उपचारांचे संशोधन व्हावे आणि ‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ ने त्यासाठी पुढाकार घ्यावा ‘ असे आवाहन नामवंत शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी आज केले .
‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ च्या वतीने ‘एसिकोन २०१५ ‘ या ३ दिवसीय २८ व्या अखिल भारतीय परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी डॉ रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते ‘भारत आणि उत्तमतेचा प्रगत शोध ‘ या विषयावर परिषदेचे उद्घाटक या नात्याने बोलत होते. मेरीयट हॉटेल येथे हि परिषद आजपासून सुरु झाली
‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ चे अध्यक्ष डॉ साजन हेगडे ,परिषदेचे सचिव डॉ अमोल रेगे , पुणे ‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन चे माजी अध्यक्ष डॉ शरद हर्डीकर ,तसेच डॉ राम छड्डा ,डॉ सौम्यजित बसू ,डॉ विनोद इंगळहल्लीकर आणि आंतर राष्ट्रीय प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते
डॉ माशेलकर म्हणाले ,’ बदलत्या काळात भारत जोमाने प्रगती करीत आहे . संशोधनातील प्रगत उत्कृष्ठ्ता परवडणाऱ्या दरात सर्वाना उपलब्ध होत आहे . अशावेळी आरोग्याच्या क्षेत्रातही अत्याधुनिक ,उत्कृष्ट तरीही सर्वाना परवडणाऱ्या उपचारांचे संशोधन व्हावे आणि ‘असोसिअशन ऑफ स्पाइन सर्जन ‘ ने त्यासाठी पुढाकार घ्यावा ‘
‘सर्वांसाठी आरोग्य ‘ हे मिशन शक्य तेत उतरविण्यासाठी भारतीय नागरीक,संस्था ,संशोधक आणि उदयोगानि पुढे यायला हवे . कमीत कमी छेद घेवून मणक्याच्या शस्त्रक्रिया चे संशोधन होत असले तरी इथून पुढे छेद न घेताच मणक्याचे उपचार शक्य होतील याचे संशोधन करावे ‘ असे ते म्हणाले
उत्कृष्ट संशोधन ,तंत्रज्ञान आणि सुविधा महाग दरात देण्यापेक्षा ,सर्वाना परवडणाऱ्या दरात मिळण्याची गरज आहे . जयपूर फुट ,हृदय शस्त्रक्रिया ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,लशी या आरोग्य क्षेत्रातील उतृष्ठ आणि परवडणाऱ्या भारतीय संशोधनांची उदाहरणे त्यांनी दिली
डॉ साजन हेगडे आणि डॉ अमोल रेगे यांनी स्वागत केले