पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कॉंग्रेस, आर. पी. आय (कवाडे गट ) आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश बागवे यांनी आज जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित घोरपडी भागात आज झालेल्या पदयात्रेत जेष्ठ नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना शुभेछा दिल्या आज सकाळी घोरपडी प्रभाग क्रंमांक ४१ पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचा वार्डचा सात येथे पदयात्रे द्वारे घरोघरी जाऊन प्रचार केला . .
आजची पदयात्रा घोरपडी गाव मधील अनंत टाकीज , श्रावस्तीनगर , बालाजीनगर , श्रीनाथनगर , निगडेनगर , संपूर्ण बी. टी. कवडे रोड , डोबरवाडी परिसर , जांभुळकर मळा , प्लेझंट पार्क , चिमटा वस्ती , बंगला नंबर २या भागामध्ये प्रचार करून व्हिक्टोरिया रोड येथे समारोप झाला .
या पदयात्रेत माजी उपमहापौर प्रकाश मंत्री , माजी नगरसेविका मंगला मंत्री , प्रदीप परदेशी , अरविंद अंगिरवाल ,तुषार मंत्री , पुणे कॅंटोन्मेंट कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष असिफ शेख , मुन्ना शेख , संजय वाघमारे , रमेश पोळ , राजेश राजोरे , टोनी फ्रान्सिस , किशोर पाटे , योगेश घोडके , संजय त्रावडन, नासीर खान , सागर नवगिरे , रेणुका रजपूत , मीना काकडे , शांती कटमणी, मधुकर चांदणे, गंगाधर शर्मा आदी कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते