एकीकडे मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी मजल मारतोय तर दुसरीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्येही मराठी चित्रपटाची सरशी पहायला मिळते आहे. मराठी फिल्ममेकर्स सिनेमासाठी सखोल अभ्यास आणि प्रचंड मेहनत घेतांना दिसताय, खैरलांजीच्या माथ्यावर हा ज्वलंत विषयावरचा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी त्यांच्या आगामी टी.एच.फिल्म्स व सिध्हीविनायक इन्फोमीडिया निर्मित (तुकाराम बिडकर, राधा बिडकर, कुंदन ढाके) आणि अनिल गावंडे प्रस्तुत झरी या मराठी चित्रपटासाठी चित्रपटातील नायिकांना भन्नाट अट घातली ती म्हणजे, त्यांनी भूमीकेसाठी तीन ते चार दिवस खेडयात जाऊन रहायचं ते देखील चित्रपटातील नायिका म्हणुन नाही तर सामान्य व्यक्ती म्हणुन आणि त्याप्रकारे दोन्ही नायिका नम्रता गायकवाड आणि निशा परुळेकर यांनी खेडयात मुक्कम केला.
गावात वीज नाही, दळणवळणाची कोणतीही साधनं नाही, मोबाइलला रेंज नाही, साध्या जगण्याच्या सोयी सुविधा नसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सुकरी गावात सलग तीन दिवस दोघींनी काढले, याबाबत नम्रता सांगते की, झरी चित्रपटातील भूमिका समजावी म्हणुन खेडयातील भाषेचा लहेजा शिकण गरजेचं होतं म्हणुन आम्ही सुकरी गावांत जाऊन रहावं अशी योजना लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी आखली होती, हा अनुभव अविस्मरणीय होता, आपल्याला शहरात सर्व सुखसोयींची सवय असते, पण भारतातील ग्रामीण भाग अजूनही किती मागासलेला आहे ते यामुळे आम्हाला समजलं, त्यांच जीवनमान पाहुन अंगावर शहारे आले, अन्याय म्हणजे काय हे देखील त्यांना माहीत नाही, आपलं शोषण होतंय हे त्यांना माहीतच नाही, अशा खेडयात जाऊन वास्तव्य करतांना आम्ही अभिनेत्री असल्याचं त्यांच्यापासून लपवलं होतं, त्यामुळे त्यांची जीवनशैली जवळून पहाता आली, झरीची भूमिका सजीव करण्यासाठी या गोष्टीचा खुप फ़ायदा झाला.
निशा परुळेकर सांगते की, त्या गावातील चित्र खुप विदारक वाटलं कारण आज आपण जे जीवन जगत आहोत ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला अजुन किती वर्ष लागतील त्याचा अंदाज बांधता येणार नाही, आपण सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयींमध्ये जगतोय पण त्यांच्या मुलभुत गरजा देखील पूर्ण होत नाहीत, तिथले कायदेही त्यांचेच आहेत म्हणुन प्रचंड भीती वाटत होती, पावलोपावली अंधश्रद्धेचे दर्शन घडत होते, अशा परिस्थीतीत तीन दिवस मुक्काम करणे जरी जिकिरीचं काम असलं तरी समाजातील एक घटक आजही अशा प्रकारचं जीवन जगत असल्याचं दु:ख मनात होतं, त्यांना माणूस म्हणुन जगन्याची संधी कधी मिळणार हा प्रश्न डोक्यात ठेऊन आम्ही तिकडचा निरोप घेतला.
लेखक दिग्दर्शक राजू मेश्राम याबाबत सांगतात की, नम्रता आणि निशा यांना सुकरी गावांत रहायला पाठवणे ही चित्रपटाची गरज होती, शहरात राहिलेल्या कलाकारांच्या अंगी ग्रामीण भागातील आयुष्य भिनलं जावं आणि पडदयावर त्याचं अचूक चित्र उमटावं हा त्यामागचा मूळ हेतु होता, त्यांनी दुर्गम भागातीत संस्कुती जवळून अनुभवावी, त्यांच चालनं, बोलनं, वागनं अंगीकारावं आणि त्याचा भूमिकेसाठी त्यांना फ़ायदा व्हावा यासाठी नम्रता आणि निशा यांना सुकरी गावांत वास्तव्य करायला सांगितले.
चित्रपटाला प्रवीण कुवर यांचे संगीत असून चित्रपटात तुकाराम बिडकर, मिलिंद शिंदे, अनिकेत केळकर, नागेश भोसले, अनंत जोग, कमलेश सावंत, डॉ. संदीप पाटील, विजय दिवे, अशोक शिरोळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
