पुणे कॅम्पमधील रेसकोर्सजवळील गुरुद्वारा गुरुनानक दरबारच्यावतीने ” रोको कॅन्सर ” हे मोफत कॅन्सर तपासणी वैद्यकीय शिबीर घेण्यात आले . गुरुद्वाराच्या आवारात घेण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराचे उदघाटन मनजितसिंग विरदी फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी व भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर यांच्याहस्ते करण्यात आले . ग्यानी हरभजन सिंग यांनी आरदास करून शिबिरास सुरुवात करण्यात आली . या शिबिरात ६०० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली .
यावेळी गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष हरमिंदरसिंग घई , सचिव चरणजितसिंग सहानी , उपाध्यक्ष करमजितसिंग आनंद ,जनसंपर्क अधिकारी मोहिंदरसिंग कंधारी , अमरजितसिंग छाबरा व गुरुद्वाराचे पदाधिकारी उपस्थित होते . या शिबिरात सर्व कॅन्सरच्या तपासण्या मोफत करण्यात आले . ज्यांना कॅन्सर आजार आढळेल त्यांना ” रोको कॅन्सर ” मार्फत सर्व वैद्यकीय उपचार मोफत केले जातील .
या शिबिरासाठी पुणे कॉस्मोपॊलिटन राउंडटेबलचे अध्यक्ष समीर जैन , स्वप्नील कोठारी , रितेश मेहता , मनिष मुथ्था , शिल्पा ठक्कर व विन्सेट ओल्ड बॉयज असोसिएशनचे अध्यक्ष बॉबी जेकब यांनी विशेष परिश्रम घेतले .