पुणे – केएसबी पंम्प लिमिटेडच्या कामगारांना दहा हजार रुपयांची घसघशीत वेतनवाढ जाहीर झाली आहे. गुलाल व भंडा-याची उधळण करत कामगारांनी कराराचा आनंदोत्सव साजरा केला.
केएसबी पंम्प लिमिटेडचा पिंपरी-चिंचवड विभाग व केएसबी मजदूर युनियन यांच्यात वेतनवाढीचा करार नुकताच पार पडला. वेतनवाढीमुळे कामगारांचे किमान वेतन ४३ हजार ५६८ तर कमाल वेतन ५५ हजार २७० रुपये प्रतिमाह झाले आहे. २०१३ ते २०१६ या कालावधीसाठी हा करार करण्यात आला.
करारामुळे कामगारांना आपली घरदुरुस्ती अथवा मुला-मुलींच्या लग्नासाठी तीन लाख रुपयांचे कर्ज पाच वर्षाच्या परत फेडीवर मिळणार आहे. हे कराराचे वैशिष्ट्य ठरले. याखेरीज गृहभत्त्यामध्ये १६५७ रुपये, शैक्षणिक भत्त्यामध्ये १४०४, गणवेश भत्त्यामध्ये ९५० आणि वैद्यकीय भत्त्यामध्ये २९८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कराराचा फरार नोव्हेंबरच्या वेतनात मिळणार असून तो सुमारे एक ते दीड लाख रुपये असणार आहे. ३५२ कामगारांना या वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्रात मंदीचे वातावरण असतानाही चांगल्या प्रकारचा वेतनकरार झाल्याची प्रतिक्रिया कामगार संघटनेच्या पदाधिका-यांनी दिली.
वेतनकरारावर व्यवस्थापनाच्या वतीने मनुष्यबळ विभागाचे संचालक शिरीष कुलकर्णी, उत्पादन विभागाचे संचालक नंदन परांजपे, सरव्यवस्थापक नितीन पाटील, गुणवत्ता विभागाचे सरव्यवस्थापक आर. बी. सवदीकर, मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक किरण शुक्ल यांनी तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष सॅमसन उर्फ श्याम चक्रनारायण, सरचिटणीस सतिश सगलगिले, सहसचिव सुधाकर कुदळे, लक्ष्मण पाटील, दिपक पवार, उपाध्यक्ष शामकांत साबळे, विजय गायकवाड, जनार्दन शिंदे, उपखजिनदार ए. जे. पीटर, सदस्य सतिश कुलकर्णी, साक्षीदार म्हणून व्यवस्थापनाच्या वतीने विवेक कुंटे, अजय जडे आणि कामगारांच्या वतीने पी. व्ही. पाटील, डि. जी. कारभारी यांनी स्वाक्षरी केली.
केएसबी कामगारांना दहा हजार रुपयांची वेतनवाढ
Date: