ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन भवानी पेठ विभागाच्यावतीने चुडामण तालीमजवळील अलंकार मेडिकलजवळ ” मोफत दंत तपासणी शिबीर ” संपन्न झाले . या मोफत दंत तपासणी शिबीरामध्ये २०० जणांची दंत तपासणी करण्यात आली . या शिबिराचे संयोजन ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन भवानी पेठ विभागाचे अध्यक्ष मझहर गफर कुरेशी यांनी केले होते . या शिबिरासाठी रंगूनवाला दंत महाविद्यालयाच्या दंत विभागाचे प्रमुख डॉ. मोहम्मद अन्वर उलहक व डॉ. रेखा शितोळे यांनी दंत तपासणी केली . यावेळी मोफत औषधे व सल्ला देण्यात आला . या शिबिरात अनेक जणांचे किडलेले दात , हिरड्या कमजोर असल्याचे तसेच , वेडेवाकडे दात आढळले . या शिबिराचे आयोजन ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन पुणे जिल्हा अध्यक्ष मोईनुद्दीन सय्यद , पुणे शहर अध्यक्ष सरफराज शेख , शाबीर शेख , संतोष पवार , सय्यद शरीफ , अयाझ खान , निझाम शेख , शहबाज खान , प्रल्हाद थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले .
ऑल इंडिया मज्लीस ए इतेहादुल मुस्लिमन भवानी पेठ विभागाच्यावतीने “ मोफत दंत तपासणी शिबीर ” संपन्न
Date: