एवढे प्रेमच होते तर … तुम्ही का नाही काढला बाजीराव पेशव्यांवर चित्रपट … भन्साळी समर्थकांचा सवाल …

Date:

पुणे- गेली १३ वर्षे संजय लीला भन्साळी यांनी ‘ बाजीराव मस्तानी ‘ या चित्रपटावर काम केले . अनेक अडचणी आणि असंख्यवेळा अडचणींचा मोठ्ठ्या हिकमतीने सामना करीत संजय लीला भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या चित्रपटाची निर्मिती केली . आता बाजीराव पेशवे हिंदुस्थान ची अस्मिता आहेत , ते थोर आहेत, महान योद्धे होते  म्हणूनच त्यांच्यावर हा चित्रपट त्यांनी काढला … इतके वर्षे मेहनत घेतली , इतका पैसा खर्च केला … आता चित्रपट आल्यावर –किंवा प्रदर्शित होण्यापूर्वी पुण्यातील किंवा जे कोणी त्यांचे समर्थक आहेत आणि जे आता या चित्रपटाविरुध्द बोलत आहेत लिहित आहेत आंदोलने करीत आहेत , त्यांना जर खचितच बाजीराव पेशवे यांच्याबद्दल प्रेम होते तर त्यांनी यापूर्वीच का नाही बाजीराव पेशवे यांच्यावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून चित्रपट काढला … ? असा सणसणीत सवाल आज संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयात आज दुपारी संपर्क साधला असता त्यांच्या समर्थकांकडून  करण्यात आला . पुण्याचे होते ना बाजीराव … बस एक पुतळा बसविला …या शिवाय त्यांची महती जगाला समजावी म्हणून  त्यांच्या पराक्रमाची … प्रेमकथेची …कशी आणि कुठे दखल घेतली ? असाही सवाल यावेळी करण्यात आला . जो काम करतो त्याच्याच चुका दाखविल्या जातात … जो करीतच नाही त्याच्या चुका कशा आणि कुठून लक्षात येणार यासाठी हा सवाल करण्यात आला आहे असेही यावेळी नमूद करण्यात आले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कुस्ती व खो-खो मध्ये महावितरण संघाला विजेतेपद

पुणे, दि. ८ मे २०२६: येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले. एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो- १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो- अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो- राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो- रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो- सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो- अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो- अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो- बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो- अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो- विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण). यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६  विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे. बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.  

अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणांवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व्यथित

थेऊर, लोणावळा, अकोला, कोल्हापूर आणि सोलापूर प्रकरणांत कठोर कारवाई,...

चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन: आरोपीला तात्काळ बेड्या: २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

पुणे- खाण्याचे आमीष दाखवुन चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणा-या आरोपीला...

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार,निकाल कुठे पाहता येणार?

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च...