नवी दिल्ली – भारतातील बड्डी व मुलुंड येथील प्लांट्समध्ये जॉन्सन्स बेबी पावडरचे उत्पादन जॉन्सन अँड जॉन्सनने पुन्हा सुरु केले आहे. सरकारने मंजुरी दिलेल्या परीक्षणातून असे आढळून आले आहे की, या उत्पादनामध्ये ऍसबेसटॉस नाही. या निष्कर्षामुळे जगभरातील विद्यापीठे, संशोधन प्रयोगशाळा व सरकारी नियामकांनी केलेले स्वतंत्र परीक्षणांना समर्थन मिळाले आहे, या सर्व परीक्षणांमधून नेहमी असे आढळून आले आहे की, आमची टॅल्क सुरक्षित आहे.
गेल्या काही महिन्यात सिंगापूर, थायलंड, सौदी अरेबिया, जॉर्डन, कुवेत व इजिप्त या देशांमधील नियामक अधिकाऱ्यांनीदेखील जॉन्सन अँड जॉन्सन टॅल्कच्या शुद्धतेची पुन्हा हमी दिली आहे. आमची टॅल्क सुरक्षित आहे हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. या टॅल्कमध्ये ऍसबेसटॉस नाही हे सुनिश्चित करण्यासाठी पुरवठादार व स्वतंत्र प्रयोगशाळांकडून याची नियमितपणे तपासणी केली जात असते. जागतिक पातळीवरील नियामकांसोबत जॉन्सन अँड जॉन्सनने नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांनी मागितलेली १९६० च्या दशकापासूनची सर्व माहिती तसेच कॉस्मेटिक टॅल्कचे स्रोत व प्रोसेस्ड टॅल्क आम्ही त्यांना परीक्षणासाठी उपलब्ध करवून दिली. संशोधन, क्लिनिकल पुरावे व जगभरातील स्वतंत्र वैद्यकीय तज्ञांच्या ४० वर्षांच्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष कॉस्मेटिक टॅल्क सुरक्षित असल्याचे सांगतात. हजारो स्त्री-पुरुषांना सहभागी करवून घेऊन केलेल्या अभ्यास व संशोधनातून असे आढळून आले आहे की, या टॅल्कमुळे कर्करोग किंवा ऍसबेसटॉसशी संबंधित आजार होत नाही.