भाऊराव कऱ्हाडे यांच्या आगामी ‘बबन’ मधील ‘साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला…’ गाणे प्रदर्शित

Date:

‘साज ह्यो तुझा, जीव माझा गुंतला…’  या सोप्या शब्दाआधी येणारी व्हायोलिन ची कर्णमधुर सुरावट, त्यावर बासरीचा सुंदर साज अशा या अवीट गाण्यावर हळुवारपणे ठेका धरायला लावणारा ताल आणि स्क्रीनवर दिसणारे सुंदर खेडेगाव, हिरवीगार शिवारे, याच गावातले कॉलेज आणि एका सुंदर मुलीवर भाळलेला,  शेती आणि दुग्धव्यवसाय करणारा,  चांदरातीला उशाखाली तिचा फोटो ठेवून प्रेम व्यक्त करणारा आजच्या काळातला शेतकरी तरुण.

ही दृश्ये आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांच्या आगामी बबन या रोमँटिक चित्रपटातल्या गाण्यातील.

समाजाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या “ख्वाडा” या अनेक मानाचे पुरस्कारप्राप्त चित्रपटाच्या यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे, एका तरुण शेतकऱ्याची प्रेमकथा बबन या चित्रपटातून घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचीच आहे. या चित्रपटाच्या टीजर ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यानंतर नुकतेच या चित्रपटातील ‘साज ह्यो तुझा’ हे रोमँटिक गाणे प्रसिद्ध करण्यात आले आणि अल्पावधीतच हे गाणे  व्हायरल झाले आहे. सुहास मुंडे यांनी लिहिलेल्या या गीताचे संगीतकार आणि गायक आहेत ओंकारस्वरूप.

हळुवार प्रेमभावना व्यक्त करणारे अतिशय श्रवणीय असे हे गाणे भाऊसाहेब शिंदे आणि या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री गायत्री जाधव यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. सुंदर लोकेशन्स, सतत गुणगुणावी वाटेल अशी सोपी चाल यामुळे ‘साज ह्यो तुझा’ हे गाणे तरुण पिढीचे पुढचे ‘लव्ह अँथम’ ठरले तर आश्चर्य वाटायला नको.

‘चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रशियन सैन्य उघडपणे इराणला पाठिंबा देणार..जगाने श्वास रोखला ….

या एका ट्वीट ने जगाचा श्वास रोखला आहे...

‘किराना परंपरा’ : गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या सांगीतिक योगदानावर रविवारी कार्यक्रम

पुणे : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचालित स्वरमयी गुरुकुलतर्फे ‘किराना...

मर्सिडीज-बेंझ भारतात सुरू करणार V-Class चे स्थानिक उत्पादन

भारतीय ग्राहकांसाठी स्टँडर्ड स्वरूपात एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस; AIRMATIC सस्पेन्शन, लक्झरी सीट्स, AMG लाईन एक्स्टेरिअर, व्हेंटिलेटेड सीट्स. V-Class (डीझेल V300d आणि पेट्रोल V300) ची संपूर्ण भारतात एक्स-शोरूम प्रारंभिक किंमत 1.4 कोटी रु. “भारतीय बाजारपेठेसाठी एकदम कोरी करकरीत नवीन V-Class सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्या विशेष ग्राहकांना लक्झरी, प्रशस्त जागा आणि त्यांचा खाजगीपणा जपत उत्कृष्ट अनुभव देत ‘प्रायव्हेट सूट’ ची संकल्पना नव्याने परिभाषित करत आहे. प्रवास करताना ज्या ग्राहकांना लक्झरीच्या जोडीला वैयक्तिक जागा, शांतता आणि खाजगीपणा हवा असतो अशा भारतातील संपन्न ग्राहक आणि ट्रेंड सेटर यांच्यात वाढत असलेल्या प्रवाहाला प्रतिसाद देणारी V-Class आहे. आमच्या ग्राहकांसाठी लक्षणीय मूल्यवृद्धी करत V-Class चे स्थानिक उत्पादन सुरू करण्याचा निर्णय आमची भारताबद्दलची बांधिलकी अधिक दृढ करतो.” मर्सिडीज-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर ·         एकदम नवीन V-Class एक्स्ट्रा लॉंग व्हीलबेस (WB:3430mm L:5370 mm) कॉन्फिगरेशनसह अत्याधुनिक 6-सीट लेआउटमध्ये सादर करण्यात आली आहे ·         V-Class भारतात प्रथमच पेट्रोल इंजिनसह सादर ·         V-Class चे AIRMATIC एअर सस्पेन्शन विशेषतः भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहेत ·         Dual Powertrain: पेट्रोल (170 kW /...

श्रीलंकेजवळ इराणी जहाजावर पाणबुडीद्वारे हल्ला:श्रीलंकन नौदलाने 32 जखमींना वाचवले, अनेकजण बेपत्ता

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने इराणमधील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या...