उंड्री वडाचीवाडी ते म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) नवीन बसमार्ग सुरू

Date:

पुणे-
पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक १७६ उंड्री वडाचीवाडी ते म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक श्रीनाथ भिमाले, भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षा मा. डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांच्या हस्ते उंड्री येथे या बससेवेचे उदघाटन करण्यात आले. डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांनी या बससेवेसाठी पाठपुरावा केला.
याप्रसंगी पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, स्वारगेट डेपो मॅनेजर राजेश कुदळे,  राजेंद्र भिंताडे, सौ. जयश्री पुणेकर, डॉ. अश्विन खिलारे, दादासाहेब कड,ओंकार होले, विठ्ठल भिंताडे, बाकी काय सचिन हांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्ग क्रमांक १७६ – उंड्री वडाचीवाडी ते म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) या बस सेवेचा मार्ग वडाचीवाडी, उंड्री गाव, वसंत अपार्टमेंट, एनआयबीएम दोराबजी मॉल, लुल्ला नगर, कमांड हॉस्पिटल, म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) असा असणार आहे. सध्या या बसमार्गावर एका
बसद्वारे दर तासाला बस सेवा उपलब्ध असेल. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील.
याप्रसंगी बोलताना पुणे मनपाचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक श्रीनाथ भिमाले म्हणाले, “पीएमपीएमएलच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेने पुणे शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये १० रुपयांत दिवसभर प्रवास व पुणे मनपा हद्दीत ४० रुपयांत दिवसभर प्रवास अशा योजना लागू करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. तसेच पीएमपीएमएल च्या
ताफ्यात ई-बस व सीएनजी बस वाढविल्या जात आहेत. पीएमपीएमएलने नागरिकांची गरज ओळखून नवीन बसमार्ग सुरू केले आहेत. सदरची बससेवा सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर दरात प्रवास करता येणार आहे.
पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले,”या बससेवेमुळे उंड्री व परिसरातील प्रवासी नागरिकांना पुणे शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणारे म. गांधी स्टॅन्ड (पुलगेट) पर्यंत जाता येईल व तिथून पुढे स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर ला जाण्यासाठी पीएमपीएमएलची पूरक बससेवा मिळेल. पीएमपीएमएलने नव्याने सुरू केलेल्या एका मनपा हद्दीसाठी ४० रू. व दोन्ही
मनपा हद्दीसाठी ५० रू. व पीएमपीएमएलच्या संपूर्ण संचलन क्षेत्रासाठी ७० रू. च्या दैनिक तसेच ९००, १२०० व १४०० रूपयांच्या मासिक पासेसचा लाभ घ्यावा.”
डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अश्विन खिलारे यांनी आभार मानले. पीएमपीएमएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सत्कार करून सदर बस सेवा सुरु केल्याबद्दल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचे  आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब नगरपरिषद निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री अजित...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका: रामदास आठवले

रिपब्लिकन पक्ष हा भाजपचा सच्चा साथीदारपुणे :रिपब्लिकन पक्ष हा...