मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ बिलियर्ड्समध्ये अमी कमानी व किरथ भंडाल यांच्यात अंतिम लढत

Date:

वरिष्ठ स्नूकरमध्ये ब्रिजेश दमानी, मनन चंद्रा, आलोक कुमार यांचे सहज विजय

पुणे: बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या वतीने आयोजित व मनिषा कन्स्ट्रक्शन आणि व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेड प्रायोजित मनिषा-व्हॅस्कॉन बिलियर्ड्स व स्नूकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत वरिष्ठ मुलींच्या बिलियर्ड्स गटात अमी कमानी, किरथ भंडाल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील नव्याने उभारण्यात आलेल्या बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत वरिष्ठ स्नूकर मुलांच्या गटात राउंड रॉबिन फेरीत न गटात माजी आशियाई क्रीडा स्पर्धेतील रजत पदक विजेत्या पीएसपीबीच्या ब्रिजेश दमानी याने आरएसपीबीच्या मोहम्मद हुस्सेनचा 4-0(67-08, 82(48)-06, 78(44)-02, 57-43) असा सहज पराभव केला. ओ गटात पीएसपीबीच्या आलोक कुमार हिने पश्चिम बंगालच्या अर्शद झामाचा 4-1(70-17, 88-16, 56-07, 45-68, 67-12) पराभव करून आगेकूच केली. प गटात पीएसपीबीच्या मनन चंद्रा याने रोवीन डिसुझाचा 4-0(54-51, 69-44, 64-09, 87-07) असा पराभव केला. ओ गटात पंजाबच्या अनमोलदिप सिंग याचे महाराष्ट्राच्या राहुल सचदेवाचा 4-1(73-03, 64-21, 64-18, 14-86(61), 66-55) असा पराभव केला.

वरिष्ठ बिलियर्ड्स मुलींच्या गटात उपांत्य फेरीत मध्यप्रदेशच्या अमी कमानी हिने कर्नाटकाच्या आर.उमादेवी नागराजचा 3-2(76(32)-70, 38-76, 75(36)-40, 29-76, 76(32)-11) असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या  किरथ भंडाल हिने महाराष्ट्राच्या अरांता सॅचेसचा  3-2(75(46)-17, 75-48, 72-76, 54-76, 75-46) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: वरिष्ठ बिलियर्ड्स मुली: उपांत्य फेरी:

अमी कमानी(मध्यप्रदेश)वि.वि.आर.उमादेवी नागराज(कर्नाटक)3-2(76(32)-70, 38-76, 75(36)-40, 29-76, 76(32)-11);

किरथ भंडाल(दिल्ली)वि.वि.अरांता सॅचेस(महाराष्ट्र)3-2(75(46)-17, 75-48, 72-76, 54-76, 75-46);
वरिष्ठ स्नूकर मुले: राउंड रॉबिन फेरी: 

गट अ: मनीष जैन(पश्चिम बंगाल)वि.वि.आदित्य अगरवाल(आरएसपीबी)4-1(62-14, 68-35, 72-22, 22-64, 78(48)-19);

गट इ: नितेश मदन(आरएसपीबी)वि.वि.अनुज भार्गवा(उत्तरप्रदेश)4-1(48-60, 70-52, 71-05, 74-45, 65-58);

गट जे: मलकीत सिंग(आरएसपीबी)वि.वि.सुरज राठी(महाराष्ट्र)4-0(70-06, 83(57)-35, 127(62,65)-08, 59-15);

गट जे: दिव्य शर्मा(हरयाणा)वि.वि.पुष्पेंदर सिंग(आरएसपीबी)4-3(80-17, 24-54, 60-46, 65-20, 64-78, 40(40)-95(95), 50-44);

गट के: अनुराग गिरी(मध्यप्रदेश)वि.वि.अनुज उप्पल(दिल्ली)4-1(44-85(53), 89-24, 95(81)-40, 93-29, 79-11);

गट ल: शाहबाज खान(पीएसपीबी)वि.वि.तहा खान(महाराष्ट्र)4-1(76-21, 96(49)-23, 40-58, 96(57,30)-00, 92(31)-16);

गट ल: नीरज खेमका(पश्चिम बंगाल)वि.वि.रफत हबीब(आरएसपीबी)4-0(67-58, 50-36, 66-39, 65-29);

गट म: एस. श्रीकृष्णा(पीएसपीबी)वि.वि.खिझर रौफ(तेलंगणा)4-3(50-48, 08-78, 18-64, 50-64, 105(98)-13, 77-14, 112(112)-00);

गट म:अक्षय कुमार(उत्तरप्रदेश)वि.वि.आशुतोष पाधी(ओडिशा)4-2(38-43, 18-63, 64-45, 71(58)-48, 59-58, 60-57);

गट न: आर. गिरीश(आरएसपीबी)वि.वि.शिवम अरोरा(महाराष्ट्र)4-1(51-27, 74-49, 78(65)-00, 17-64, 77-16);

गट न: ब्रिजेश दमानी(पीएसपीबी)मोहम्मद हुस्सेन(आरएसपीबी)4-0(67-08, 82(48)-06, 78(44)-02, 57-43);

गट ओ: आलोक कुमार(पीएसपीबी)वि.वि.अर्शद झामा(पश्चिम बंगाल)4-1(70-17, 88-16, 56-07, 45-68, 67-12);

गट ओ: अनमोलदिप सिंग(पंजाब)वि.वि.राहुल सचदेवा(महाराष्ट्र)4-1(73-03, 64-21, 64-18, 14-86(61), 66-55);

गट प: मनन चंद्रा(पीएसपीबी)वि.वि.रोवीन डिसुझा(आरएसपीबी)4-0(54-51, 69-44, 64-09, 87-07);

गट प: धर्मिन्दर लिली(पंजाब)वि.वि.आय.एच.मनुदेव(कर्नाटक)4-1(70-04, 77-00, 78-07, 17-73, 65-53);

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...