पुणे- अवघ्या १० लाखाचा जुना चेन बुलडोझर घेऊन टेंडर अगोदरच काम केल्याचा बनाव करून महापालिकेला सुमारे १० कोटीचा चुना संगनमताने लावल्याचा आरोप करीत या संदर्भातले कामा नंतर आलेले टेंडर स्थायी समितीने रद्द करावे आणि संगनमत करणाऱ्या तीन अभियंत्यांवर आयुक्तांनी तातडीने निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी आज कॉंग्रेसचे माजी गटनेते ,नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केली आहे . आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अरविंद शिंदे यांनी सांगितले कि, आपण या संदर्भात महापालिका आयुक्त यांना लेखी पत्र दिले असून महापौर आणि स्थायी समितीं अध्यक्ष यांनाही भेटून या प्रकरणाची माहिती देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत . पहा नेमके शिंदे यांनी या संदर्भात नेमके काय सांगितले आहे .
१० कोटीची बनवाबनवी ? स्थायी समिती ने ‘ते’टेंडर रद्द करावे-अरविंद शिंदे यांची मागणी (व्हिडीओ )
Date:

