महाबळेश्वर -कोल्हापुरातील (ता. हातकणंगले)व साताऱ्यातील तासवडे (सातारा) येथील टोल नाक्यावर फास्ट टॅग लेन मधून ,तुमचा फास्ट टॅगब्लॅक लिस्टेड आहे असे सांगून जबरदस्तीने फास्ट टॅग मधून आणि रोखीने देखील वाहन चालका कडून वसुली करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते आहे . विशेष म्हणजे तौमर नामक तरुणाने येथे गुंड शाही करत हि वसुली चालविली आहे. .माध्यम प्रतिनिधींना देखील चित्रीकरणास मज्जाव करणे .अशा पद्धतीने इथे हि दादागिरी करत लुटमार सुरु आहे . हे प्रकार ज्या पद्धतीने सुरु आहेत त्यावरून नक्कीच इथे कोणाचा वरदहस्त असल्या शिवाय असा कारभार होवू शकत नाही असे दिसते आहे.
तक्रार पुस्तिकेची मागणी केल्यास गाडी सोडा व ऑफिसात या असे दमदाटी करून सांगण्यात येत असल्याने कोणी सहसा तक्रार करण्यास धजावत नाही मात्र एखादा गेलाच तर त्याला तक्रारीची प्रत अथवा मोबाईलवर तक्रारीचा फोटो काढण्यास मज्जाव केला जातो आहे.
कार, जीप अशा हलक्या वाहनांसाठी 75 रुपये इतका टोल आहे .हलक्या मालवाहतूक वाहनांना 135 तर ट्रक, बस, अवजड वाहनांना 265 रुपये इतका टोल द्यावा लागतो देशातील सर्वच टोलवर रिटर्न टोलची सुविधा आहे. तासवडे टोल नाक्यावर मात्र अनेकवेळा मागणी करूनही ही सुविधा देत नाही.आता तर फास्ट टॅग लेन लुटमारीचे नवे साधन बनले आहे .