आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्वचजण त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देत आहेत. शरद पवारांच्या कन्या राष्ट्रवादीच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांनी वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी या ट्विटमध्ये वडिलांसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून लिहिले, ‘तुम्ही आमच्यासाठी अखंड उर्जेचा स्रोत आहात. तुम्ही आम्हाला विचारांचा उज्ज्वल वारसा दिला आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याचं बळ देखील… बाबा, तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. तुम्हाला निरोगी असे दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..’