● 30000+ विद्यार्थी आणि त्यांचे पालक महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये भाग घेतील
● 3000+ अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनाही लाभ मिळणार
बेंगळुरू, 9 ऑक्टोबर 2021: ऑर्किड्स-द इंटरनॅशनल स्कूल, 10 ऑक्टोबरपासून मानसिक आरोग्य महिन्याचे आयोजन करणार आहे, जेणेकरून आज आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्ये “कोविडनंतरचे मानसिक कल्याण”बद्दल जागरूकता पसरवली जाऊ शकेल. ऑर्किड्सद्वारे 10 ऑक्टोबर आणि 10 नोव्हेंबर 2021च्या दरम्यान सर्व विद्यार्थी, पालक आणि सर्व शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासह कार्यक्रमांची मालिका आयोजित केली जाणार आहे.
मानसिक आरोग्य समस्यांबाबत विद्यार्थी, पालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण
करण्यासाठी, ऑर्किड्स त्यावर एक टॉक शो आयोजित करत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ञ या विषयाला हाताळतील आणि मानसिक सुदृढतेशी संबंधित शंका दूर करण्यास मदत करतील. ते 10 ऑक्टोबर रोजी प्रख्यात डॉक्टर आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांसह एक लाफ्टर थेरपी सत्र आणि एक टॉक शो आयोजित करणार आहेत.
ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये “सोच” नावाचा एक विशेष शिक्षण विभाग आहे- हा विद्यार्थ्यांना
शाळेकडून भावनिक आणि मानसशास्त्रीय पाठिंबा मिळत आहे या बाबीची खात्री करण्यासाठी
नियमितपणे निरीक्षण करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी एक उपक्रम आहे. ज्याचा अर्थ “विचार करणे होतो” अशा या “सोच”द्वारे विद्यार्थ्यांचे शहाणपण वाढवण्यासाठी निवडक मॉड्यूलद्वारे सामाजिक-भावनिक शिक्षण (एसईएल) प्रदान केले जाते, जे आयुष्यभर त्यांच्या यशासाठी अत्यावश्यक असणारी आत्म-जागरूकता, आत्म-नियंत्रण आणि परस्पर वैयक्तिक कौशल्ये विकसित करते. सोचद्वारे इतर विषयांसह सामाजिक जागरूकता, ध्येय निश्चित करणे आणि जबाबदारपणे निर्णय घेणे या बाबींचा देखील विकास करते.
ऑर्किड्स-द इंटरनॅशनल स्कूलच्या समुपदेशन आणि उपाय विभागाच्या प्रमुख श्रीमती नेहल जे. सेक्वेरा या उपक्रमावर भाष्य करताना म्हणाल्या, “आम्ही ऑर्किड्सचा असा विश्वास आहे की, मुलाला जीवनात यशस्वी होण्यासाठी मानसिक आरोग्य मूलभूत आहे आणि आम्ही मुलाच्या फक्त पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी त्याच्या सर्वांगीण विकासावर काम करतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक यश कमी करू शकणाऱ्या तणाव, चिंता, नैराश्य किंवा इतर कोणत्याही वर्तणुकीच्या विकारांच्या भावनिक आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांबरोबर काम करतो. आम्ही विद्यार्थी, पालक आणि ऑर्किडच्या सर्व कर्मचाऱ्यांना अशा निरोगी पद्धतींचे पालन करण्याचे मार्गदर्शन करतो, ज्यांच्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल.”
जागरूकता महिन्यादरम्यान, ऑर्किडच्या सर्व शाखांचे विद्यार्थी सहकार्य करतील आणि मानसिक
आरोग्याशी संबंधित शैक्षणिक व्हिडिओ आणि पोस्टर्स विकसित करतील. सोच कार्यक्रमाच्या
माध्यमातून त्यांचे शिक्षण कौशल्य कशा प्रकारे विकसित होईल, हे स्पष्ट करून ते त्यांच्या स्वतःचे सोच समाप्ती उपक्रम सामायिक करतील. कार्यक्रमाचे अंतिम वेळापत्रक समुपदेशकाच्या “ऑर्चॅडिओ प्रोग्राम्स” नावाच्या टॉक शोमध्ये सादर केले जाईल ज्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षेची चिंता, पौगंडावस्थेतील आव्हाने, पालक-मुलांचे संबंध, भावनिक कल्याण इ. या सारख्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विषयांवर, समुपदेशक आणि प्राचार्य यांच्यातील चर्चेचा समावेश असेल.
ऑर्किड्सद्वारे प्रत्येक आठवड्यात एक व्हिडिओ आणि एक सर्जनशील संवाद पोस्टर प्रसिद्ध केले
जाईल, जे प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करणाऱ्या
महत्त्वाच्या विषयांना लक्ष्यित करेल.