पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशाला संबोधित करत आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली.यावेळी ते म्हणाले की, कोरोना विरोधातील लढाई जनता कर्फ्यूपासून आजपर्यंत आपण खूप मोठा प्रवास केला आहे. वेळेनुसार आर्थिक गाडा हळु-हळू पुर्ववत येत आहे. आपल्यातील अनेकजण आयुष्य रुळावर आणण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. सणासुदीच्या या काळात बाजारातही झगमगाट दिसत आहे. पण, आपल्याला हे विसरुन चालणार नाही की, लॉकडाउन संपला आहे, पण कोरोना व्हायरस आताही आहे. पहा आणि ऐका नेमके ते काय म्हणाले …
पंतप्रधान मोदींनी कोरोना काळात आतापर्यंत केलेले संबोधन
तारीख | घोषणा | वेळ |
19 मार्च | जनता कर्फ्यूची घोषणा | 29 मिनीटे |
24 मार्च | 21 दिवसांचा लॉकडाउन | 29 मिनीटे |
3 एप्रिल | दीप प्रज्वलनाचे आवाहन | 12 मिनीटे |
14 एप्रिल | लॉकडाउन-2 ची घोषणा | 25 मिनीटे |
12 मे | 20 लाख कोटीच्या आर्थिक पॅकेजची घोषणा | 33 मिनीटे |
30 जून | अन्न योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा | 16 मिनीटे |