शांतीलाल कटारिया उपाध्यक्ष क्रेडाई नैशनल
स्थिर सरकार राहिल्याने होणारा फायदा बांधकाम क्षेत्रासही होईल. घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या दृष्टीने मोदी सरकारने गेल्या तीन ते चार वर्षात अत्यंत प्रभावी निर्णय घेतले याचा फायदा अनेक मध्यमवर्गीयांनाही होत आहेत . या निर्णयांचा विचार करता, बांधकाम क्षेत्राची उलाढाल वृध्दींगत होण्यास व्हावा अशी आशा आहे. कोणत्याही क्षेत्रात स्थैर्य अत्यंत महत्त्वाचे असते. बांधकाम क्षेत्रापुरते सांगायचे झाल्यास, ग्राहकांचे व विकसकांचे अनेक निर्णय हे बाजारातले स्थैर्य या गोष्टींवर अवलंबून आहेत. बांधकाम क्षेत्रात सध्या आशेचे वातावरण असून बऱ्याच प्रतीक्षेनंतर गुंतवणूक दारांसाठीही आता चांगले दिवस आले आहेत.
पायाभूत सुविधांवर सध्याचा सरकारचा भर असल्याने आगामी काळात होऊ घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, राज्यातील मेट्रो प्रकल्प, एकूणच देशभरात कार्यान्वित असलेले विविध विकास प्रकल्पांचाही फायदा बांधकाम क्षेत्राच्या भरारी होईल असे वाटते. नवीन सरकार कडून बांधकाम क्षेत्राला असणाऱ्या अपेक्षांचे सादरीकरण आम्ही प्रधानमंत्री कार्यालयात सादर केले असून त्यावरही सकारात्मक निर्णय होतील अशी क्रेडाईची अपेक्षा आहे.
राजीव परीख अध्यक्ष क्रेडाई महाराष्ट्र
बांधकाम उद्योगात सुलभता येण्यासाठी पर्यावरण, शहर नियोजन, एनए परवानगी यात बदल करणे अपेक्षित आहे. जलद आणि ऑनलाइन प्रकल्प मंजुरी, कर संरचना सुधारणा यावर आगामी सरकारने भर द्यावा. परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे येत्या काळात आवश्यक आहे. पायाभूत सुविधा बरोबरच शहर सुधारणेसाठी रस्ते, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, मुबलक पाणी पुरवठा करण्यावर भर द्यायला हवा. एकूणच वेगवान विकासासाठी व बांधकाम व्यवसायाच्या प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचाही अवलंब आगामी सरकारने करावा असे वाटते.
————————–
अतुल गोयल व्यवस्थापकीय संचालक गोयल गंगा डेव्हलपर्स (इं) प्रा. लि
विजयाने आत्मविश्वास वाढतो. आणि सकारात्मकतेची उत्पत्ती होते. म्हणूनच हा सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन नवीन सरकारला निधीची उपलब्धता सुनिश्चित करून बाजाराची उन्नती करण्याकडे भर द्यावा. या सरकारची धोरणे विकासात्मक असली तरी पण खाजगी उद्योगाद्वारे रोजगार तयार करणे हे मोठे आव्हान या सरकारपुढे असेल. यासाठी ठोस निधीची पूर्तता करावी लागेल. २०२० पर्यंत आम्ही बाजारात मोठ्या वाढीची आम्ही अपेक्षा करतो.