पुणे- उस्मानाबाद जवळील एका खेड्यातील .. 50 रुपये रोजावर शेतात खुरपायला जाणारी हि महिला .. बचत गटाचा आधार घेतला … आणि तब्बल पाच हजार महिलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे .. उद्योग व्यवसाय तिने सुरु करून दिले . आता महाराष्ट्रातून १० हजार महिलांना व्यवसाय सुरु करून देण्याचा तिने निर्धार केला आहे .
कमल कुंभारे नाव असलेल्या या महिलेला काल सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , सप्ताहाचे आयोजक माजी आमदार मोहन जोशी आदींनी या महिलेचे कौतुक केले .. पहा आणि ऐका ..हि महिला सांगते आहे स्वतःची कहाणी ..तिच्याच शब्दात ..