व्यापाऱ्यांसाठी ३ ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा
कर्ज मिळवण्याकरता पगारदारांसाठी किमान पगार प्रतीवर्ष ८४ हजार, तर स्वयंरोजगारांसाठी एक लाख रुपये प्रतीवर्ष पगाराची अट
पुणे– आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडने (आयसीआयसीआय एचएफसी) पुण्यातील स्वयंरोजगारित व्यक्ती, कमिशन एजंट, फर्निचर उत्पादक, व्यापारी, इलेक्ट्रिकल साहित्याचे व्यापारी, हॉटेल मालक, टॅक्सी मालक, किराणा दुकानाचे मालक, केशकर्तनालयाचे मालक इतर व्यापारी आणि पगारदारांसाठी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी (एलएपी) लाँच केली आहे. या कर्जामुळे त्यांना नवा व्यवसाय सुरू करता येईल, चालू व्यवसायाचा विस्तार करता येईल किंवा तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील. आयसीआयसीआय होम फायनान्स एलएपी योजनेचा निवासी व्यक्तींना लाभ घेता येणार असून त्यासाठी पगारदारांसाठी किमान पगार प्रतीवर्ष ८४ हजार, तर स्वयंरोजगारांसाठी एक लाख रुपये प्रतीवर्ष पगाराची अट आहे.
जलद आणि सोप्या पद्धतीने मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीने त्यांच्या पुणे शाखेत – ११८७/२२ वेंकटेश मेहेर, दुसरा मजला, घोले रस्ता, शिवाजी नगर, पणे ४११००५ आणि वाकड शाखा – ऑफिस क्रमांक १०१, पहिला मजला, फॉर्च्युन बिझनेस सेंटर, अम्बियन्स हॉटेल जवळ, कस्पटे वस्ती, वाकड, पुणे ४११०५७ या ठिकाणी १८ आणि १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय एलएपी शिबिराचे आयोजन केले आहे.
पगारदार कर्मचारी, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी पात्रता तपासून घेण्यासाठी आपल्यासोबत आयटीआर, पॅन कार्ड, आधार कार्ड ठेवावे. त्याशिवाय उत्पन्नाचा औपचारिक पुरावा (आयटीआर) नसलेल्या व पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांना आणि ग्राहकांना घर किंवा व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असल्यास आयसीआयसीआय एचएफसी शाखेला भेट देता येईल.
पुण्यात एलएपीचे लाँच करताना आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिरूद्ध कामानी म्हणाले, ‘लोन अगेन्स्ट प्रॉप्रटी ही आमची योजना व्यवसाय विस्तार करू इच्छिणारे महत्त्वाकांक्षी व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी किंवा त्यांच्या आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी लाँच करण्यात आली आहे. पुणे शैक्षणिक संस्था तसेच खाद्यपदार्थ व पेय क्षेत्रासाठी प्रसिद्ध असून इथल्या व्यावसायिकांना आणि एमएसएमई क्षेत्राला विस्तार करण्यासाठी मदत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’