पुणे-सामाजिक दायित्वाचे निर्वाहन करत , बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचार्यांनी केरळच्या आपत्ति ग्रस्त नागरिकांसाठी केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी आपले एक दिवस वेतन दिले. बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री ए सी राउत यांनी दी. 25.10.2018 रोजी तिरुवनंतपुरम येथे विशेष कार्यक्रमात केरळचे माननीय मुख्यमंत्री श्री पिनाराय विजयन यांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचार्यांच्या वतीने केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी रु 2,39,02,192.रुपये (दोन करोड़ रुपये, एकोणचालिस लाख दोन हजार एकसे ब्यानवे) चा चेक सोपविला या कार्यक्रमास चेन्नई विभागीय व्यवस्थापक श्री राजेश कुमार सिंह तसेच अन्य बँक अधिकारी उपस्थित होते.