‘सवाई ​ ​ गंधर्व भीमसेन महोत्सवा’ दरम्यान ‘षड्ज’ व ‘अंतरंग’ कार्यक्रमांचे आयोजन

Date:

unnamed1

षड्ज’ मधून प्रेक्षकांना मिळणार संगीतावर आधारित ४ लघुपटांचा नजराणा

·      ‘अंतरंग’मध्ये प्रतिथयश कलाकारांशी संवाद

·      सुप्रसिद्ध गायक गुंदेचा बंधू यांना यावर्षीचा ‘वत्सलाबाई जोशी स्मृती पुरस्कार’ जाहीर

·      महोत्सवा दरम्यान प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचे ‘तबकडी युग’ हे विशेष प्रदर्शन

पुणे : ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चाच एक भाग असलेला ‘षड्ज’ हा अभिजाt भारतीय शास्त्रीय संगीताशी संबंधित लघुपट महोत्सव तसेच ‘अंतरंग’ हा ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम याही वर्षी दि. ७, ८  व ९ डिसेंबर दरम्यान पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटर जवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी १० ते १२.३० या वेळेत होणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्वावर त्यासाठी प्रवेश दिला जाणार आहे, तसेच काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

या विषयीची घोषणा आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी आज आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत केली. प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे ही यावेळी उपस्थित होते.

‘षड्ज’ व अंतरंग महोत्सवातील कार्यक्रम–
दिवस पहिला- बुधवार दि. ७ डिसेंबर
‘षड्ज’ अंतर्गत पहिला दिवस भारतरत्न एम. एस. सुब्बालक्ष्मी आणि भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना समर्पित केला जाईल. या दोन्ही कलाकारांची यंदाच्या वर्षी जन्मशताब्दी असून, या कार्यक्रमाद्वारे त्यांना आदरांजली वाहण्यात येईल. या दिवशी व्ही. राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला सुप्रसिद्ध कर्नाटकी गायिका भारतरत्न सुब्बलक्ष्मी यांच्या वरील माहितीपट दाखविण्यात येईल. यानंतर शहनाई वादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांवर डॉ. के. प्रभाकर यांनी दिग्दर्शित केलेला माहितीपट उपस्थितांना पाहता येईल.

याशिवाय ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा पहिला दिवस (बुधवार, ७ डिसेंबर) हा उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना तर चौथा दिवस (शनिवार, १० डिसेंबर) भारतरत्न एम. एस सुब्बालक्ष्मी यांना समर्पित करण्यात येईल.

दिवस दुसरा – गुरुवार, दि. ८ डिसेंबर
ख्यातनाम कलाकारांबरोबरचा संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखला जाणा-या ‘अंतरंग’ मध्ये यावर्षी ‘सूरबहार’ वादक उस्ताद इर्शाद खान व प्रसिद्ध गायक गणपती भट यांची मुलाखत पार पडेल.

दिवस तिसरा – शुक्रवार दि. ९ डिसेंबर
तिस-या दिवशीच्या ‘षड्ज’ मध्ये फिरोझ चिनॉय दिग्दर्शित कै. डॉ. वीणा सहस्त्रबुद्धे यांना अभिवादन करणारा माहितीपट दाखविण्यात येईल. यानंतर संवादिनीवादक पं. गोविंदराव पटवर्धन यांवर धनंजय मेहेंदळे व ओंकार प्रधान दिग्दर्शित माहितीपटही दाखविण्यात येईल. यानंतर होणा-या ‘अंतरंग’ दरम्यान बासरीवादक भगिनी देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांची मुलाखत होईल.

 

‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ प्रसिद्ध गायक गुंदेचा बंधू यांना

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना दरवर्षी दिला जाणारा ‘वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ यावर्षी प्रसिद्ध धृपद गायक पद्मश्री पं. उमाकांत गुंदेचा व पद्मश्री पं. रमाकांत गुंदेचा अर्थात गुंदेचा बंधू यांना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचे हे बारावे वर्ष असून पुरस्काराचे स्वरूप एकूण रोख रुपये ५१ हजार, मानपत्र व स्मृती चिन्ह असे आहे. महोत्सवाच्या पहिल्या बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल.

या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी असलेले गुंदेचा बंधू हे धृपद गायक असून सहगायनासाठी प्रसिद्ध आहेत. फरीदुद्दिन डागर व झिया मोइनुद्दीन डागर यांचे शिष्य असलेल्या या दोन्ही बंधूनी अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये धृपद गायीकीला एक वेगळे स्थान मिळवून दिले आहे. गुरु- शिष्य परंपरेच्या माध्यमातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने या बंधूनी भोपाळ येथे ‘धृपद संस्थान’ नावाने स्वत:ची संस्था स्थापन केली आहे. आतापर्यंत त्यांनी भारताबरोबरच अमेरिका, इग्लंड, युरोप, जपान, अरब इमिराती, हॉंगकॉग या ठिकाणीही अनेक कार्यक्रम केले आहेत.

 

सतीश पाकणीकर यांचे छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन-
‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’चा एक महत्त्वाचा भाग म्हणून पुण्याचे प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचे दरवर्षी भरविण्यात येणारे छायाचित्रांचे प्रदर्शन हे महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असणार आहे. यावर्षीच्या प्रदर्शनाचे नाव ‘तबकडी युग’ असे असून या प्रदर्शना अंतर्गत ग्रामोफोन रेकॉर्ड्सच्या सुवर्णकाळात प्रसिद्ध झालेल्या व काही जाणकार संगीत रसिकांनी जतन करून ठेवलेल्या निवडक अशा रेकॉर्ड्सच्या मुखपृष्ठ व मलपृष्ठांच्या छायाचित्रांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. ही प्रदर्शनी रेकोर्डच्या मुख व मलपृष्टावरील उत्कृष्ठ डिझाईन, विविध प्रकारची टायपोग्राफी, आकर्षक रंगसंगती व रेकॉर्डमध्ये समाविष्ट असलेल्या राग- संगीतासह कलाकाराची माहिती या सर्व गोष्टी टिपणारी आहे हे विशेष. याप्रदर्शनीमध्ये मुख्यत: उस्ताद विलायत खॉं, उस्ताद अमीर खॉं, पं. माणिक वर्मा, पं. हिराबाई बडोदेकर, पं. मोगुबाई कुर्डीकर, पं. भीमसेन जोशी यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या ग्रामोफोन रेकॉर्ड्सच्या छायाचित्रांचा समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ रसिकांबरोबरीनेच आजच्या नवीन पिढीतल्या रसिकांना त्या सुवर्णकाळात नक्की घेऊन जाईल यात शंकाच नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रसिकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल या पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक संस्थेने बसेसची विशेष सेवा देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार रमणबाग ते कात्रज, रमणबाग ते आनंदनगर मार्गे सिंहगड रस्ता, धायरी, रमणबाग ते कोथरूड डेपो आणि रमणबाग ते कर्वेनगर या मार्गांचा समावेश आहे. याबरोबरच संस्थेने मंडळाकडे बसेसच्या उपलब्धतेबाबत सविस्तर निवेदनही दिले असून बसेसच्या वेळांची माहिती महोत्सवादरम्यान देण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करा-खासदार मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेत मागणी

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेकडे वेधले लक्ष वर्षाकाठी १० हजार कोटींचे आर्थिक...

पुण्यात हिंदू महासभा रिंगणात:महापालिका निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

पत्रकार परिषदेत प्रदेश कार्यकारिणीकडून माहिती पुणे:अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी...

अवैध मद्य तस्करीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. 18 डिसेंबर : परराज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध...