Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुण्यातील तरुणांच्‍या जीवनात प्रकाश आणणारा ‘लाईट हाऊस प्रकल्प’

Date:

भारत हा तरुणांचा देश म्‍हणून ओळखला जातो. या तरुणांच्‍या शक्‍तीचा देशविकासात उपयोग करुन घेण्‍यासाठी विविध योजनांचा अवलंब केला जात आहे. महाराष्‍ट्र पुरोगामी विचाराचे राज्‍य असून येथे युवाशक्‍तीचा सकारात्‍मक वापर करुन घेण्‍यासाठी नावीन्‍यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.

पुणे हे राज्‍याची शैक्षणिक राजधानी म्‍हणून ओळखले जाते. अत्‍यंत वेगाने वाढणा-या पुणे शहरात तरुणांची संख्‍याही वेगाने वाढत आहे. आजच्‍या तरुण पिढीला आपली स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी विविध मार्ग उपलब्‍ध असली तरी नेमक्‍या कोणत्‍या मार्गांचा वापर करावयाचा, याबाबत त्‍यांच्‍या मनात संभ्रम असतो. ज्‍यांची आर्थिक परिस्थिती उत्‍तम असते, ते आपल्‍या सोयीनुसार स्‍वत:च्‍या पायावर उभे राहू शकतात. मात्र, ज्‍यांची आर्थिक, सामाजिक परिस्थिती अनुकूल नसते, अशा वस्‍ती पातळीवरील तरुणांसाठी पुणे महानगर पालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत “लाइट हाउस- कौशल्य विकास आणि रोजगार केंद्र” हा प्रकल्‍प वरदान ठरत आहे.

पुण्यातील वस्तीपातळीवरील तरुण आणि तरुणींसाठी स्वतःची करिअर विषयक स्वप्‍ने प्रत्यक्षात आणण्यासाठी आणि त्यातून उपजीविकेचे साधन मिळवून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास पूर्ण मदत करण्याच्या हेतूने जून 2016 हा प्रकल्‍प सुरु झाला. औंध, येरवडा आणि हडपसर येथे 3 लाइट हाऊस केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. लॅपटॉप, व्हिडीओ वॉल यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, प्रत्येक विद्यार्थ्यास करिअरची वाट शोधण्यासाठी वैयक्तिक लक्ष तसेच विद्यार्थी आणि त्याच्‍या कुटुंबाला महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती करून घेण्याची संधी हे या प्रकल्पाचे वैशिष्‍ट्य आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आवडता कौशल्य विकास कार्यक्रम येथे विनामूल्य करता येतो.

प्रकल्‍पाच्‍या अमृता बहुलेकर म्‍हणाल्‍या, वयाची 18 वर्षे पूर्ण केलेला विद्यार्थी जेव्‍हा लाइट हाऊस मध्ये पहिल्यांदा येतो तेव्‍हा कोणताही कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यापूर्वी, 80 तासाच्या (अंदाजे 20 दिवसांच्या ) फाउंडेशन कोर्सने या प्रवासाची सुरुवात होते. स्वतःमधील क्षमता, बुद्धिमत्ता आणि कौशल्य परत एकदा शोधायची संधी यातून मिळते. विविध खेळ आणि सर्जनशील उपक्रमातून संभाषण कौशल्य, नेमकेपणाने आपले मत मांडणे, गटामध्ये सगळ्यांसोबत काम करणे, नेतृत्व कौशल्य आजमावणे याची संधी मुलांना मिळते. स्वतःचा शोध घेतानाच आजच्‍या काळात कोणत्या प्रकारच्या कामाला जास्त वाव आहे, हे देखील ही मुले प्रत्यक्ष प्रकल्पामधून स्वतः शिकतात. कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांवर देखील फाउंडेशन कोर्स मध्ये काम केले जाते.

पुणे सिटी कनेक्‍टच्‍या ऋची माथूर यांनी ‘लाइट हाऊस’ ही एक  ‘सुरक्षित जागा’ असून या सगळ्या गोष्टी करताना एक मोकळेपणा येत असल्‍याचे सांगितले. आपापसात विश्वास निर्माण होण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होते. इथे आलेली व्यक्ती, कोणताही भेदभाव न करता, ‘माणूस’ म्हणून तिच्या भल्या-बुऱ्या गुणांसकट  स्वीकारली जाते. योग्य संधी आणि साथ मिळाली तर प्रत्येक व्यक्तीमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे, यावर आमचा विश्वास आहे आणि यावरच हे केंद्र उभारलेले आहे, असे त्‍या अभिमानाने सांगतात.

फाउंडेशन कोर्स पूर्ण केलेल्या तरुण वर्गाची आवड, क्षमता आणि गुणवत्ता, व्यक्तिमत्व याविषयी अधिक माहिती देणारी करिअर टेस्ट घेतली जाते. या चाचणीचा निकाल, तरुणाचे मत, आणि भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचे आणि पालकांचे समुपदेशन केले जाते. मग विद्यार्थी पूर्ण विचार करून कौशल्य विकास कार्यक्रमाची निवड स्वतः करतात. याबाबत त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन, त्यांनी सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन घेतलेला निर्णय अंतिम असतो. या केंद्राद्वारे विविध प्रकारचे कौशल्य विकास कार्यक्रम चालू आहेत. उदा. टॅली, कॉम्पुटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी आणि हेल्थ, जिम इंस्ट्रक्‍टर, नर्सिंग सहायक, कुकिंग, ग्राफिक डिझाइन, सॉफ्टवेअर लँग्वेजेस हे व इतर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. याच सोबत संगणक साक्षरतेचे शिक्षणही  सर्वांना दिले जात असल्‍याचे  गणेश नटराजन यांनी सांगितले.

लाइट हाऊस प्रकल्प इतर कौशल्य विकास कार्यक्रमांपासून वेगळा आहे कारण, कोणत्याही टप्प्यावर शिक्षण थांबवणारी कोणतीही अडचण आल्यास लाइट हाऊसची पूर्ण टीम त्या मुलीमागे/मुलांमागे उभी असते आणि निवडलेला कोर्स पूर्ण होईल याची आपलेपणाने खबरदारी घेतली जाते. कोर्स पूर्ण झाल्यानंतर मुलांना काम शोधण्यासाठीच नव्हे तर कामावरचे मुखत्वे पहिले 3 महिने पूर्ण होईपर्यंत त्यांना मदत आणि मार्गदर्शन केले जाते. अर्थात लाइट हाऊसमध्ये एकदा आलेली व्यक्ती या परिवाराचा कायमस्वरूपी सदस्य बनते.

पुणे महापालिका क्षेत्रात चालू असलेल्‍या 4 केंद्रांमध्ये एकत्रितपणे 4 हजारांहून अधिक तरुण वर्ग सहभागी झालेला आहे. यापैकी 2 हजार 400 हून अधिक तरुणांनी  कौशल्य विकास कार्यक्रम निवडून, ते कौशल्य शिकण्यास सुरुवात केलेली आहे. उर्वरित विद्यार्थी फाउंडेशन कोर्सशी निगडित या प्रवासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. 816  मुले टेक महिंद्रा, मेट्रो ग्लोबल, इन्फोसिस, न्यांसा अशा संस्थांमध्ये कार्यरत आहेत आणि काही स्वतःचा व्यवसाय  यशस्वीपणे  चालवत आहेत.

     वंदना पगार यांनी लाईट हाऊसमध्‍ये प्रशिक्षण घेतले. सध्‍या त्यांनी स्वतःचा मसाला बनवण्याचा व्यवसाय सुरु केला असून  परदेशातही मसाले पाठवत आहेत.  ‘लाइट हाऊस’मुळे आशेचा नवीन किरण सापडल्याचे त्‍या सांगतात.  लाईट हाऊसच्या मदतीने त्‍या स्वतःचे स्नॅक सेंटरही सुरु करणार आहेत.

‘इन्फोसिस’मध्ये काम करणारा अल्ताफ सय्यद म्हणतो, लाइट हाऊसमध्ये येऊन मी माझे संभाषण कौशल्य सुधारले. इंदिरा वसाहत, औंध ते इन्फोसिस हा प्रवास माझ्यासाठी अनेक नव्या शक्यता निर्माण करणारा आहे. वस्तीतील प्रत्येक तरुणाला या पर्यंत आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असा निर्धार त्याने व्‍यकत केला.

लाइट हाऊसमध्ये आलेल्या तरुण-तरुणींच्‍या माध्यमातून वस्त्यांचे परिवर्तन होण्यासाठी अथक प्रयत्न चालू आहेत. पुण्यातील प्रत्येक प्रशासकीय वॉर्डमध्ये लाइट हाऊसची स्थापना करून पुण्यातील वस्ती पातळीवरील तरुण  पिढीचे आर्थिक, सामाजिक परिवर्तन करण्याचा प्रयत्‍न करण्‍यात येत असल्‍याचे महापालिकेचे आयुक्‍त सौरभ राव यांनी सांगितले. लाईट हाऊसच्‍या निमित्ताने सरकारी यंत्रणा, विविध कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि जागरुक  नागरिक या साऱ्यांना एकत्रितपणे सकारात्मक बदलासाठी काम करण्याची संधी निर्माण झाली आहे.

    सध्या लाइट हाऊस पुण्यातील 4 ठिकाणी चालू आहे. लाइट हाऊसमध्ये कोर्सेस विनामूल्य शिकवले जातात. इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन नोडल ऑफीसर गणेश सोनुने यांनी केले आहे.   लाइट हाऊस – औंध – जुने औंध वॉर्ड ऑफिस, ब्रेमेन चौक, औंध. (संपर्क – अश्विनी – ७२१८१६६६०५), लाइट हाऊस – येरवडा- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे  ई – लर्निंग स्कूल, अण्णाभाऊ साठे सभागृहामागे, गुंजन टॉकीज शेजारी, येरवडा. (संपर्क- श्रुती – ९८३४५५५७३०), लाइट हाऊस – हडपसर – हडपसर  पी.एम.टी. बिल्डिंग, तिसरा मजला, हडपसर (संपर्क- विजय -९९७५७८७९४१),लाइट हाऊस –  वारजे – तिरुपती नगरशेजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वारजे नाका (संपर्क- विद्या – ९४०३१४८७९२)

सरकारी यंत्रणा, विविध कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि जागरुक  नागरिक  या सर्वांच्‍या सहकार्याने  हे ‘लाईट हाऊस’ अधिकाधिक तरुणांच्‍या जीवनात प्रकाश आणो, हीच सदिच्‍छा.

-राजेंद्र सरग

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...