जॅक्वार ग्रुप या भारतातील आघाडीच्या संपूर्ण बाथरूम आणि लायटिंग उपाय प्रदाता कंपनी तर्फे डिझाईन कॉनफॅब या अनोख्या मंचाची सुरूवात केली असून या मंचा च्या माध्यमातून आर्किटेक्ट्स आणि विकासक एकत्र येऊन डिझायनिंग ची कौशल्ये आणि ज्ञान एकमेकां समोर प्रदर्शित करतील .
पहिल्या जॅक्वार ग्रुप डिझाईन कॉनफॅब चा विषय ‘बेस्ट प्रॅक्टिसेस फॅार स्मार्ट, हा परफॉर्मन्स इंडियन बिल्डिंग्ज’ हा आहे. या विभागातील सर्वोत्कृष्ट आणि कार्यक्षम प्रक्रियांचा गौरव करण्यासाठी जॅक्वार कडून बाजारपेठेतील काही कौशल्यपूर्ण आणि बांधकाम क्षेत्रातील मंडळींना आमंत्रित करून त्यांचे विचार आणि संकल्पना, प्रक्रिया आणि दृष्टिकोन यांचे आदानप्रदान करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जॅक्वार कडून नेट झिरो बिल्डिंग चे सादरीकरण होय. हे सादरीकरण जीएनए (आर्किटेक्ट गायत्री शेट्टी आणि नमित वर्मा) चे सुधीर सादर करणार आहेत. त्याचबरोबर जकुआर ग्रुप तर्फे जकुआर ग्रुपच्या मुख्यालयाला युनायटेड स्टेट्स ग्रीन बिल्डिंग काऊन्सिल (यूएसजीबीसी) कडून लीड प्लॅटिनम सर्टिफाईड रेटिंग मिळाल्याचीही घोषणा करण्यात येणार आहे. हे प्रमाणन सर्वोत्कृष्ट असे ईमारतीला मिळणारे ग्रीन प्रमाणन आहे. यूएसजीबीसी ही दैदिप्यमान आणि दीर्घकालीन भविष्यासाठी आणि उर्जा बचतीसाठी काम करणारी संस्था आहे. परिणामी हे प्रमाणन मिळवणारी भारतातील पहिली अशी ही कार्यालयीन ईमारत ठरली आहे.