पुणे:
भारती विद्यापीठच्या ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) ने आयोजित केलेल्या ‘आयएमईडी डी-फिएस्टा’ आंत्रप्रुनर फेअर(उद्योजकता यात्रा) या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला वाव देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध सेवा आणि खाद्यपदार्थांचे २५ स्टोल उभारण्यात आले होते .कॅम्प डायरीज ‘ या स्वयंसेवी संस्थेनेही यात सहभाग घेतला .आयएमईडी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी उद्घाटन केले.डॉ.भारती जाधव यांनी आभार मानले.’आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला.

