पुणे- ‘त्यांचा निरोप जाऊ देत ,त्यांची ‘मनधरणी ‘ ‘त्यांच्या’कडून होऊ देत आपोआप ‘पक्ष हिताच्या ‘ गोंडस नावाखाली ‘त्या ‘ निष्ठावंतांचा विरोध मावळून पडेल ..आणि तेच घोषणा देतील ..सबसे बडा खिलाडी …====
कॉंग्रेसचे वाट्टोळे जर कोणी करू शकते तर अन्य पक्षांची त्या साठी आवश्यक्यता निश्चितच नाही. कॉंग्रेस मधीलच निष्ठावंत म्हणवून घेणारे ‘ते ‘ मुठभर त्यासाठी कायम कार्यरत राहिले आहेत याची प्रचीती गेली कित्येक वर्षे कॉंग्रेस मधील जुन्या जाणत्या ..पण ‘सिर्फ देखते रहो..झंडा लहराते रहो’ एवढीच ताकद उरलेल्या पण शेकडो कार्यकर्त्यांनी वारंवार घेतली आहे . वारंवार म्हणण्यापेक्षा जेव्हा नेतृत्वाचा प्रश्न येतो , तेव्हा, तेव्हा याची प्रखर प्रचीती आली आहे . बॅरिस्टर गाडगीळ यांच्या अस्ताच्या काळात सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व उदयास येत असताना असे अनेक ‘निष्ठावंत ‘ कॉंग्रेसच्या खऱ्या कार्यकर्त्यांनी पाहिलेत, ज्यांनी कलमाडींना प्रखर विरोध केला .धनशक्ती विरुद्ध आमची लढाई आहे असा आभास तेव्हाही निर्माण केला गेला .पण पुढे काय झाले ? हेच सारे ‘ निष्ठावंत ‘ पक्षहिताच्या गोंडस नावाने ,नंतर कलमाडींच्या आगे मागे हुजरेगिरी करताना सातत्याने दिसून आले .याच पर्वाची आताही पुनुरावृत्ती होत असल्याचे समीक्षकांना वाटते आहे .
पुण्याच्या कॉंग्रेसला कलमाडी नंतर कोणी खमक्या नेता मिळाला नाही, म्हणून सामुहिक नेतृत्वाचा पर्याय स्वीकारावा लागला आणि प्रत्येकजण नेता बनला .पण कार्यकर्ता मात्र विखुरला गेला .आणि कार्यकर्ता सांभाळणारा संपूर्ण शहर पातळीवरचा नेता दिसेनासा झाला . भाजपच्या हाती सत्ता गेली आणि कॉंग्रेसची अवस्था आणखीच सैरभैर झाली .आता नोटबंदी ,महागाई आणि एकूणच आणखी काही कारणांनी भाजपच्या विषयी नाराजी पसरली असताना कॉंग्रेसला आगामी निवडणुकीत प्रियांका गांधी ,राहुल गांधी यांचा चेहरा लाभला आणि अनुकूल वातावरण आहे पण शहरात नेता नाही, असे वातावरण असताना बाहेरचा शक्तिशाली नेता मिळू शकतो असे चित्र असताना पुन्हा कॉंग्रेसचे ‘ते ‘ निष्ठावंत ‘ पक्षहिता ऐवजी स्व हिताला महत्व देवून कॉंग्रेसचे खच्चीकरण करायला ‘गुढग्याला बाशिंग ‘ लाऊन पुढे येताना दिसू लागले आहे .
दरम्यान पुन्हा एस के म्हणजे संजय काकडे नामक नव्या नेत्या चा आता कॉंग्रेस मध्ये उदय होण्याची चिन्हे असताना ,प्रवीण
गायकवाड नावाची ची नवी खेळी देखील चाणक्यनीति ने खेळली जाऊ लागली आहे . खुद्द प्रवीण गायकवाड यांनाही आपण पुण्यातून लोकसभा लढवू शकतो काय ,निवडून येवू शकतो काय याबाबत साशंकता आहेच . असे असताना त्यांच्या नावाची ‘पुडी’ कोणी का सोडावी हा प्रश्न जाणकारांना नाहक विचार करण्यासारखा वाटतो आहे.
पृथ्वीराज चौव्हाण ,हर्षवर्धन पाटील या सारख्या नेत्यांनी खरे तर या साऱ्या गोष्टींचा विचार केलाही असेल , ,ज्यांनी आयुष्यभर प्रगल्भ वाचनाचा आधार घेऊन पोपटपंची केली ,अनेक महामंडळाच्या अध्यक्ष ,उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली , त्यांना कधी 4 कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत जर कार्यक्रमाला पाहुणे म्हणून बोलाविले तर घरापासून कार्यक्रमस्थळी न्यायला आणायला गाडी आणि सोबत कार्यकर्ता किंवा माणूस हि पाठवावा लागतो .अशाज्येष्ठ अभ्यासक असलेल्या पण महापालिकेची निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या जाणकारांकडून राहुल गांधींना होणारा खाजगी पत्रप्रपंच ,राहुलगांधींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विशिष्ठ माध्यामंना कसा पोहोचतो , त्यामागे गौड बंगाल आहे कि षड्यंत्र आहे ? असे प्रश्न हि आता कॉंग्रेसच्या खऱ्या ..म्हणजे निव्वळ कार्यकर्ता म्हणून वावरणाऱ्याना निरर्थक वाटणार आहेत .निवडणुकीच्या वेळी कार्यकर्त्यांचा विचार जरूर झाला पाहिजे , पण कोणत्या निवडणुकीच्या वेळी कोणत्या कार्यकत्यांचा विचार व्हावा हि गोष्ट त्यांना महत्वाची वाटते आहे . लोकसभेला कॉंग्रेसकडे निवडून येण्याची क्षमता असलेला आज तरी उमेदार नाही हे वास्तव ते जाणून आहेत .आणि निवडून येण्याची क्षमता असणारे नवे नेतृत्व येण्या पूर्वी त्या नेतृत्वाने , आपली जागा म्हणजे स्व् जागा कायम ठेवावी आपला मान राखावा ,एवढ्यासाठीच ‘त्या ‘निष्ठावंत लोकांची धडपड सुरु आहे. हे देखील नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे असे खऱ्या कार्यकर्त्याला वाटते आहे .
प्रवीण गायकवाड यांचा विषय मात्र वेगळा आहे , त्यांना कॉंग्रेस ने उमेदवारी का म्हणून द्यावी ,त्यांची क्षमता लोकसभा जिंकण्याची नाहीच आणि नाही ..खिलाडी बनण्याची .. मग राष्ट्रवादीचा कोणी बडा नेता .. हि ‘पुडी ‘ का सोडतो आहे .. कि हि पुडी सोडून अन्य काही साधायचे आहे ,यावर विचार गरजेचा आहे . तुम्हाला प्रवीण चालेल कि संजय चालेल ? असा इशारा द्यायचा आहे काय ?या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे असेही कार्यकर्त्यांना वाटते आहे .