पुणे- भाजप सेना युती राज्यभरात २३५ जागा जिंकू शकेल ,भाजपा १४५ पार करेल तर शिवसेना ८० ते ८५ जागा पार करेल असा अंदाज आज येथे व्यक्त करताना खासदार संजय काकडे यांनी शरद पवारांना लक्ष करीत त्यांना तर यावेळी राज्यसभा मिळणे हि मुश्कील होईल असे भाकीत देखील वर्तविले आहे.शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष- शिवसेना- आरपीआय (A), रासप आणि शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शिवाजीनगर मतदार संघाच्या विकासाचा रोडमॅप ‘निर्धारनामा’च्या स्वरूपात तयार केला असून त्याचे प्रकाशन आज पत्रकार परिषदेत करण्यात आले. खासदार गिरीश बापट, खासदार संजय काकडे, माजी खासदार अनिल शिरोळे, आरपीआयचे परशुराम वाडेकर, नगरसेवक शंकर पवार आदी उपस्थित होते.यावेळी ते बोलत होते.
खासदार संजय काकडे म्हणाले, सिद्धार्थ शिरोळे यांना राजकीय वारसा असला तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते लाडके आहेत. त्यांच्या विजयासाठी विशेष लक्ष ठेवण्याची जबाबादारी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर सोपविली आहे. त्यात आम्ही सगळ्यांनीच लक्ष घातले आहे. त्यामुळे सिद्धार्थ किमान ३५ ते ४० हजार मतांनी विजयी होतील असा मला विश्वास आहे.