आमदार जगदिश मुळीक एक लाख मताधिक्याने विजयी होणार – खासदार संजय काकडे
वडगाव शेरी ःविधानसभा निवडणूकीमध्ये पुणे शहरातील आठ उमेदवार विजयी होतील. पुणे शहराचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे शहरात सर्वाधिक मताने विजयी होतील. त्यांच्या नतंर वडगाव शेरी मतदार संघातील आमदार जगदिश मुळीक एका लाखा पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होतील. वडगाव शेरी मतदार संघातील विरोधकांना मुळीक यांची धडकी भरली असल्याची मत खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केले.
वडगावशेरी मतदार संघातील भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम या महायुतीचे उमेदवार आमदार जगदिश मुळीक यांनी आज आनंद पार्क, भैरवनगर, मुंजाबावस्ती, धानोरी गावठाण, कवलड मशिद गल्ली, कलवड जकात नाका या भागामध्ये पदयात्रेव्दारे प्रचार केला. या पदयात्रेत राजू केसकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार काकडे बोलत होते. यावेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,नगरसेवक अनिल टिंगरे,योगेश मुळीक,नाना सांगडे,राहुल भंडारे, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, आबा खलसे,चंद्रकांत टिंगरे, आनंद गोयल,अशोक कांबळे, सचिन खांदवे,विशाल टिंगरे,किरण भालेराव,धनंजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काकडे म्हणाले की, वडगावशेरी मतदार संघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननारी मोठा वर्ग आहे. या मतदार संघामध्ये आमदार जगदिश मुळीक यांचे काम चांगले आहे. मतदार संघात आमदार मुळीक नगरसेवक आणि पदाधिका-यांची टीम चांगली आहे. यामुळे वडगाव शेरी मतदार संघामध्ये आमदार जगदिश मुळीक हे निवडणूक येणार हे निश्चित आहे. विरोधकांना अनामत रक्कम जप्त होण्याची भिती आहे. मुळीक यांच्या प्रचाराला नागरीकांचा उत्स्फर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी मुळीक म्हणाले की, वडगावशेरी मतदार संघामध्ये केंद्र, राज्य आणि पालिकेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात विकास काम केली आहेत. यामुळे लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप पक्षा चांगले मतदान झाले. लोकसभेची पुनावृत्ती विधानसभा निवडणूकीमध्ये् होणार आहे.