पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील विश्वासाने भाजपमध्ये असंख्य मान्यवर आणि जाणकार कार्यकर्ते सातत्याने सहभागी होत असून त्याची प्रचीती आपल्याला शिवाजीनगर या मतदार संघात प्रचार करताना येते आहे . आणि या दोन्ही नेत्यांच्या वरील अशा दृढ विश्वासाने राजकीय पटलावर भाजप महासागर बनतो आहे असे संगमवाडी येथील पदयात्रे दरम्यान शिवाजीनगर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेस मधून भाजपमध्ये आलेले आनंद चंद्रकांत छाजेड ,तसेच विजय शेवाळे,निलेश रेणुसे ,पुणे महापालिकेतील , खडकी कॅन्तोंमेंट बोर्डातील आजी माजी नगरसेवक याभागातील असंख्य मान्यवर कार्यकर्ते सहभागी झाले होते .(पहा व्हीडीओ झलक)
दरम्यान संगणकाच्या स्मार्ट युगातही पदयात्रा काढत समाजाच्या प्रत्येक स्तरातील नागरीकांपर्यंत पोहोचण्यासाठी सिद्धार्थ शिरोळे हे पारंपारिक प्रचारावर भर देत आहेत. गेल्या आठ दिवसात शिवाजीनगर मतदार संघातील विविध ठिकाणी पदयात्रा, प्रचारफे-या, मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांचा प्रचार सुरू आहे. याबरोबरच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यालयात नुकतीच सदिच्छा भेट देत प्रचारयंत्रणेचा आढावा घेत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या.
आज सकाळी देखील भांडारकर रस्ता परिसरातील दत्त मंदिर, कमला नेहरू पार्क, हिरवाई वॉकिंग ट्रॅक बरोबरच डेक्कन जिमखाना हौसिंग सोसायटीमध्ये सुद्धा शिरोळे यांनी भेट दिली. नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन शुभ आशीर्वाद घेतले, चर्चा केली व त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या. या वेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, जोत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, नाना मोरे, गणेश बगाडे, जीतू मंडोरा, दत्ता खंडागळे, प्रवीण शेळके, बाबा शिरोळे, निलेश घोडके, मिलिंद टकले आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर येरवडा येथील जय जवान नगर या ठिकाणी देखील प्रचारफेरी पार पडली. या वेळी नगरसेविका श्वेता चव्हाण, शंकर चव्हाण, केतन पवार, अंकुश राठोड, विक्रम राठोड, दीपक चव्हाण, राहुल राठोर, करण पवार, किरण चव्हाण, मोहित काकडे, निखील रणनवरे उपस्थित होते.
या अगोदर काल सायंकाळी औंध आयटी पार्क जवळील शांतिनिकेतन या सोसायटीला देखील सिद्धार्थ शिरोळे यांनी भेट दिली. सोसायटी सदस्यांबरोबर विविध बाबींवर या वेळी सविस्तर चर्चा करून नागरिकांच्या अपेक्षाही त्यांनी समजून घेतल्या. यावेळी नगरसेविका सुनीता वाडेकर, नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे आणि माजी नगरसेवक आनंद छाजेड उपस्थित होते.
दरम्यान सिद्धार्थ शिरोळे यांची आज आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. या वेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब जानराव, आरपीआय शहराध्यक्ष अशोक शिरोळे, आरपीआय युवक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका सुनीता वाडेकर, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर संपर्क प्रमुख अशोक कांबळे, आरपीआय ब्राह्मण आघाडीचे शहराध्यक्ष मंदार जोशी आणि शिवाजी नगर मतदार संघातील पदाधिकारी असलेले रोहित अडसूळ, अविनाश कदम, भीमराव वाघमारे, साहिल डोळस, ज्वेल अँथनी, अण्णा आठवले, नंदा निकाळजे, सुशील सरोवर, आप्पासाहेब वाडेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.