मुंबई – कधी इकडे कधी तिकडे अशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आता पुन्हा भाजपशी फुगडी चा फेर धरला आहे . नोटांच्या बंदीवर तातडीने काहीही भाष्य आणि विरोध न करणाऱ्या शिवसेनेने आज जनतेचे हाल पाहून अखेर तोंड उघडले . ५०० आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पाहू यात काय म्हणाले उद्धव ठाकरे …
56 इंचाची छाती 5600 इंच करा, पण हिंमत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक करुन तिथला काळा पैसा भारतात आणून दाखवा – उद्धव ठाकरे
अचानकपणे नोटा रद्द केल्याने सामान्य लोकांना त्रास होत आहे
जनतेने जर सर्जिकल स्ट्राईक केले, तर भारी पडेल .
जनतेने विश्वासाने निवडून दिलंय, त्यांचा विश्वासघात करु नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाडस अंगलटी येणार आहे.
रांगेत सर्व सामान्य माणसे दिसत आहेत.कुणी रांगेत भांडवलदार आहेत का?कुणी उद्योपती आहेत का?
एटीएम बंद का आहेत, आता नागरिकांना मुदत वाढ दिली पाहिजे.
सर्जिकल स्ट्राईक नंतर काय फरक पडला आहे, पाकिस्तानने आतापर्यंत आपले २७ जवान मारले आहेत
जोपर्यंत नोटा उपलब्ध होत नाहीत, तो पर्यंत सर्व फ्री करणार का?