पुणे-दक्षिण पुण्यातून महापालिका निवडणुकीसाठी सुरु होऊ घातलेली पुणे विकास आघाडी ‘ चा आवाज खुद्द अजित पवार यांनीच दाबून टाकला पण त्याचा फायदा म्हणून चक्क भाजपच्या पारड्यात २ शिलेदार पडले आहेत .
अभिजित कदम आणि महेश वाबळे अशी या २ शिलेदारांची नावे आहेत .जे दोघेही भाजपमध्ये दाखल झाले आहेत . राष्ट्रवादीच्या काही मातब्बरांनी बैठक घेवून सुरु केलेल्या आघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासाठी दादांनी काही जणांना उमेदवारीचे शब्द देखील दिले आहेत . या मुले विस्कटलेल्या परिस्थितीत ३५ ते ४१ प्रभागातील आगदी इच्छुकांनी आता जणू वेगवेगळा मार्ग पत्करायला सुरुवात केल्याचे चित्र आहे .
या आघाडीत कॉंग्रेसच्या अभिजित कदम आणि महेश वाबळे यांची हि नावे होती पण आता हे दोघे ही भाजपा मध्ये दाखल झाले आहेत