पुणे-शिवसेनेची सेटिंग राज्यातील जनते सोबत आहे जनतेसोबत राहील तो मित्र आणि विरोधात उभे राहिलं तो शत्रू, अशी भूमिका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. तसेच मैत्री गेली खड्डयात आमची जनतेशी बांधिलकी, असे भाजपला सुनावले.
मैत्री गेली खड्डयात आमची जनतेशी बांधिलकी- उद्धव ठाकरे
पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार निलम गो-हे, जिल्हा संपर्क प्रमुख अमोल कोल्हे, माजी मंत्री शशीकांत सुतार, माजी आमदार आणि शहर प्रमुख विनायक निम्हण, महादेव बाबर, चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी, ”आमचा मित्रपक्ष सत्तेसाठी कोठे काँग्रेससोबत तर राष्ट्रवादीसोबत सेटींग करतोय,” या मुख्यमंत्र्यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी पुणेरी पगड़ी आणि तलवार देऊन उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.