मुंबई-बेळगाव महानगर पालिका निवडणुकीच्या निकालावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये शाब्दीक टीका टीप्पणी सुरु आहे. या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला होता. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार नीलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राणे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल ट्विट करत राऊत यांचा चिमटा काढला.
यांनी बेळगाव निवडणुकीत जिंकलेल्या पक्षांची आकडेवारी दिली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला. संजय राऊत आणि शिवसेना पुन्हा तोंडावर पडले, तुमची पात्रता काय आणि तुम्ही बोलता किती अशी बोचरी टीका राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली.