मुंबई-भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांचा समावेश होताच जोरदार टीका केली आहे.भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांनी स्वतःहून ट्वीत करत संताप व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या संजय राठोडला मंत्रिपद देणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं त्या म्हणाल्या.चित्रा वाघ यांनी ट्वीट करून म्हटले की, पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रिपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. लडेंगे… जितेंगे!”
तर या शिवाय एम आय एम चे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपा नेते किरीट सोमैय्या याच राठोड यांच्याबद्दल काय म्हणाले होते याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावरून भाजपा टीकेचे धनी होत आहे. जलील यांनी ‘कल कुछऔर आज कुछ और म्हणत भाजपच्या दुटप्पी चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.