मुंबई- समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे खोटे आहे. नवाब मलिकांनी पिक्चर अभी बाकी आहे. असे म्हटले होते. पण त्या पिक्चरमध्ये अजून मी येणे बाकी आहे. क्रांती रेडकर माझ्या घरी आली. त्यामुळे आता मलाही पिक्चरमध्ये काम करावे लागेल.असे आज केंद्रीय मंत्री , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी आज क्रांती रेडकर यांची भेट घेतली. यानंतर आठवले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. समाजाचे नेते आणि आंबेडकरांचे अनुयायी आहात, आपण या संबंधी भूमिका घेतली पाहिजे, अशी विनंती मला क्रांती यांनी केली आहे. आमच्या पाठिशी उभे राहा. असे त्यांनी म्हटल्यानंतर मी त्यांच्या पाठिशी उभा आहे. असे रामदास आठवले म्हणाले.
मी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या पाठिशी आहे. हे बाबासाहेबांचे अनुयायी असून ते महारच आहेत. ते मुस्लिम नाहीयेत. त्यांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेवच आहे. त्यांना माझा आणि माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी मला सगळे डॉक्यूमेंट्स दाखवले आहेत.
नवाब मलिकांनी केलेले आरोप सगळे खोटे आहेत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत आहेत. त्यांच्या जावयाला आठ महिने डांबण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा गैरवापर करुन ते दररोज गंभीर आरोप करत आहेत, जे चुकीचे आहे. समीर वानखेडेचे कुटुंब मुस्लिम नसून दलितच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.