पुणे – मराठा मोर्चांना घाबरून झालेली युती हि मनापासून झालेली नसून ती मराठा मोर्चांना घाबरून झालेली युती आहे असे सांगत माझी खरी ताकद रस्त्यावर आहे , मी निवडणुका न लढविता देखील पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणू शकतो असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले .
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या मराठा समाजाचे मोर्चे निघतायत. त्यामुळे सध्याच्या युतीमधील अनेकांची गोची झाली असून नेहमी एकमेकांची उणीदुणी काढणारे आता युतीची भाषा करत आहेत. पण या सत्ताधाऱ्यांना विकासाचे काही देणे नसून फक्त निवडणुका लढवायच्या असून जातीचा वापर निवडणुकांसाठी करायचा असल्याची टिकाही ठाकरेनी यावेळी केलीय.
पहा नेमके राज ठाकरे काय म्हणाले ….