नवीदिल्ली- नॅशनल हेराल्ड प्रकरणात आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) राहुल गांधींची चौकशी करणार आहे. तपास यंत्रणेने सोमवारी राहुल गांधी यांची सुमारे 10तास चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चौकशीदरम्यान राहुलने ईडी अधिकाऱ्याला सांगितले की, ‘जर तुमचा मला रात्री थांबवण्याचा हेतू असेल तर मी जेवल्यानंतर चौकशीसाठी परत येतो’सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान राहुल गांधींना दिलेल्या उत्तराने तपास यंत्रणा समाधानी नाही. त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागविण्यात आली आहेत.यामुळे चौकशीसाठी आज त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे.
ईडीचा राहुल गांधी यांना प्रश्न, विदेशात खाते आहे का?, कुठे, किती आहे संपत्ती?; 10 तासांत 50 प्रश्न विचारले
काल सकाळी ११.१० वाजता ईडीच्या मुख्यालयात पोहोचलेल्या राहुल यांची दोन टप्प्यांत १० तासांपेक्षा जास्त चौकशी झाली. त्यांना ५० वर प्रश्न विचारण्यात आले. तुमची किती आणि कोणकोणत्या बँकांत खाती आहेत, असा प्रश्न ईडीने राहुल यांना विचारला. विदेशी बँक खाती आणि संपत्तीबाबतही प्रश्न विचारले. त्यांची रात्री १० वाजेपर्यंत चौकशी झाली.
- तुमची मालमत्ता कुठे आहे? परदेशात काही मालमत्ता आहे का? जर होय, कुठे आणि किती?
- AJL मध्ये तुमची भूमिका काय होती, तुम्ही यंग इंडियामध्ये कसे सामील झालात?
- यंग इंडियाचे संचालक कसे झालात? कंपनी कधी स्थापन झाली?
- यंग इंडिया AJL चा ताबा घेऊ शकेल का?
- AJL चे दायित्व काढून टाकण्यासाठी कोणाच्या निर्णयावर पैसे दिले गेले?
- तुम्ही AJL मध्ये 50 लाख रुपये किमतीच्या शेअर्सचे पैसे कसे दिले?
- तुमचा यात किती वाटा होता? तुम्ही तुमचे शेअर्स कसे आणि कितीमध्ये विकत घेतले? यासाठी पैसे कुठून आणले?
- ताब्यात घेतल्यानंतर AJL चे 90.9 कोटी रुपयांचे दायित्व का माफ करण्यात आले?
- शेअर्स स्वत:च्या नावावर घेतले, तर नॅशनल हेराल्डला काँग्रेसने 90.9 कोटी रुपये दिले का?
- टेकओव्हरसाठी जुन्या भागधारकांची बैठक झाली का? बैठक बोलावली नाही याचे कारण काय?
- AJL बुडणारे जहाज असताना काँग्रेस पक्षाने त्यास कर्ज का दिले?
- नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन करण्यामागचा हेतू काय होता?
वेणुगोपालांना धक्काबुक्की, पी.चिदंबरम यांनाही दुखापत
सकाळी ११.०० वाजता राहुल गहलोत, बघेल, पी.चिदंबरम, प्रियंकांसह काँग्रेसच्या नेत्यांसोबत पक्ष मुख्यालयातून पायी ईडी कार्यालयाकडे गेले. या नेत्यांना पोलिसांनी ईडी मुख्यालयाआधी रोखल्यावर त्यांनी धरणे आंदोलन केले. यानंतर राहुल गाडीतून ईडी मुख्यालयात गेले. चिदंबरम म्हणाले, तीन पोलिस अंगावर आल्याने बरगडीला फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे संगठन सरचिटणीस वेणुगोपाल यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.