इंदापूर विधानसभेची जागा मुळात शिवसेनेची – आढळराव पाटील
पुणे-कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या मार्गावर असताना ते ज्या विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवू पाहत आहेत तो इंदापूर विधानसभा मतदार संघ युतीच्या वाटपात शिवसेनेकडे असल्याच्या बाबी कडे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लक्ष वेधले आहे. आणि इंदापूरची जागा हर्षवर्धन यांच्या साठी भाजप जर सेनेकडे मागणार असेल तर त्या बदल्यात पुणे शहरातील २ ते ३ जागा आम्ही भाजपकडे मागू शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्याच्या हडपसर मतदार संघाचा आज आढळराव पाटीलयांनी दौरा केला अनेक ठिकाणी त्यांना यावेळी भाजप कडून सेनेला रोखण्यात येतेय काय ? असा प्रश्न विचारला गेला . या पार्श्वभूमीवर पुण्यातील जर आठ हि विधानसभेच्या जागा भाजपकडे आहेत तर सेना पुण्यात विधानसभा लढणार नाही असा अर्थ नाही. वर्षानुवर्षे सेनेत राबलेल्या आणि सेना वाढवू पाहणाऱ्या इच्छुकांचा पुण्यातून आंम्हाला विचार करावा लागेल . पुण्यातील सैनिकांची हि मागणी आपण सेनाप्रमुखांच्या कानावर घालू आणि निश्चित ते पुण्यातील सैनिकांना न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
ते असे हि म्हणाले कि, कॉंग्रेसचे हर्षवर्धन भाजपात येवून इंदापूरची जागा लढवू इच्छित असल्याच्या बातम्या आहेत . तसे जर झाले तर प्रथमतः हे लक्षात घेतले पाहिजे कि हि जागा युतीच्या वाटपात भाजपची नाही तर ती मुळात सेनेची आहे . आणि हि द्यायची झाली तर त्याबदल्यात ह आम्ही पुण्यात २ ते ३ जागा भाजपकडे मागू .
कॉंग्रेस राष्ट्रवादी मधून येणाऱ्या अनेकांसाठी जागा वाटप विषयी प्रश्न निर्माण होतील तेव्हा सेना आणि भाजप आपसात जागांची अदलाबदल करू शकेल . पण हे सर्व निर्णय सेनाप्रमुख घेणार आहेत . पुणे शहर आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांची मागणी मात्र आपण सेनाप्रमुखांच्या कानावर घालू असे ते म्हणाले .