पुणे- पूर्वी सत्ता गेल्यानंतर जनता पक्षातून कॉंग्रेस मध्ये नंतर कॉंग्रेसमधून शिवसेनेत आणि पुन्हा कॉंग्रेस आणि आता पुन्हा कॉंग्रेस सोडून भाजप मध्ये गेलेल्या सदानंद शेट्टी नी जरी कॅन्टोन्मेंट मधून कॉंग्रेसचा उमेदवार आपण पाडू असा प्रचार चालविला आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पत्नी ज्या कॉंग्रेस च्या नगरसेविका आहेत त्या कॉंग्रेसच्याच उमेदवाराला निवडून द्या असे आव्हाने करणारी भाषणे प्रचार दरम्यान ठोकीत आहेत . कॉंग्रेस कडून स्थायी समिती अध्यक्ष पद , सदा आनंद नगर उभारण्याची मिळालेली संधी अशी सारी पक्षाची देण विसरत शेट्टी यांनी नेहमीप्रमाणे आपण निष्ठावंत आहोत असा अजब दावा करत विधानसभेची उमेदवारी मागितली होती .पण त्यांची पक्ष निष्ठा सार्यान्नंच ठाऊक आहे. आणि उमेदवारी मिळाली नाही . त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसचे बागवे यांच्या प्रचारात काही काळ सहभाग घेतला . त्यांच्या पत्नी नगरसेविका सुजाता या बागवे यांचा उमेदवारी अर्ज भरण्या पासून बागवे यांच्या समवेत दिसत आल्या आणि शेट्टी मात्र कॉंग्रेसच्या विरोधात राजकीय कुरघोड्या करीत राहिले. पुण्यातील कॉंग्रेस मध्ये आणखी असे कुरघोडे बाज काँग्रेसी आहेत .पण त्यांच्याकडे सध्या लक्ष कोणाही नेत्यांनी न देता प्रचार यंत्रणेवर लक्ष केंद्रित केले आहे. एकंदरीत आपल्या नगरसेवक पदाबाबत पक्षाने कोणतीही कारवाई करू नये या साठी सुजाता शेट्टी या विशेष दक्षता घेत असाव्यात असे सांगितले जाते.
कॉंग्रेसच्या वतीने अधिकृत पणे याबाबत असे सांगितले गेले कि ,महा आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या विजयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते एकवटले असून त्याचा प्रत्यय येतो आहे,मंगळवार पेठे झालेल्या सभेत देखील आला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील मंगळवार पेठ येथील श्रमिकनगर येथे झालेल्या सभेत बोलताना नुकत्याच
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्या सदानंद शेट्टी यांच्या पत्नी ,काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सौ. सुजाता शेट्टी म्हणाल्या ‘आम्ही रमेश बागवे यांनाच बहुमताने निवडून आणणार”. रमेश बागवे यांचा दांडगाजनसंपर्क, मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेणून केलेली प्रचंड विकास कामे यांच्या जोरावर मंगळवार पेठेतील सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन कॅन्टोन्मेंटच्या विकासासाठी रमेश बागवे यांनाच निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. भीम आर्मी चे नेते दत्ता पोळं यांनीही बागवे यांना पाठिंबा देऊन भाषण केले.याप्रसंगी नगरसेविका सुजाता शेट्टी, नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, विजयचंडालिया, भगवान धुमाळ, सौ. निलीमा लालबिगे, रशीद खिजर, आमिर शेख , विजय खळदकर , विशाल मलके,सौं . वैशाली रेड्डी, अड नितीन परतानी, रवी आरडे, साहिल केदारी , राजेश शिंदे, जगताप वाल्मिकी जगताप,कल्पना भोसले व सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते.