आम आदमी पक्षाचे कॅन्टोन्मेंट मधील उमेदवार खेमचंद सोनवणे यांच्या प्रचाराला प्रारंभ
पुणे: कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदासंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार खेमचंद उर्फ शाम सोनवणे यांच्या प्रचाराला आज 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी प्रारंभ झाला
आज रोजी संध्याकाळी ६ वाजता शाम सोनवणे (आप)यांचा प्रचार प्रारंभ नारळ फोडून करण्यात आला.
पुणे स्टेशन ,आंबेडकर पुतळा येथून प्रचारा ची सुरुवात करण्यात आली.
श्रीकांत आचार्य (अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाहतूक विभाग आम आदमी पार्टी) यांनी श्रीफळ वाढवून प्रचार प्रारंभ केला.
उमेदवार सोनवणे, मनोज थोरात, श्रीकांत आचार्य, राहुल पगारे, अमोल सोनवणे, लक्ष्मी खेमचंद सोनवणे, वनीता साळवे, नरेश राजपूत, वैभव पोरे इ. उपस्थित होते