पुणे-:समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआधाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, निलेश ढमढेरे,राष्ट्रवादी उपाध्यक्ष महेश शिंदे,नगरसेवक विशाल तांबे,राष्ट्रवादी पर्वती अध्यक्ष नितीन कदम,तसेच मनसेचे पर्वती उपविभाग प्रमुख जयराज लांडगे, विभाग प्रमुख राहूल गवळी,सतीश तावरे,सनी जगताप, विकी अमराळे, सनी खरात, संतोष चव्हाण, कुशल शिंदे, अभिजित टेंबेकर,विशाल शिंदे,महेश जाधव इ.मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जयराज लांडगे(मनसे उप विभाग प्रमुख)म्हणाले, पर्वती मध्ये मनसेने दिलेला पाठींबा यामुळे पर्वती मध्ये अश्विनी कदम यांचा विजय निश्चित आहे.या विजयामध्ये मनसेचा सिंहाचा वाटा असणार आहे.तसेच उच्च शिक्षित असणाऱ्या शिक्षिका अश्विनी कदम यांना जनतेचा सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.यावेळी उमेदवार अश्विनी कदम म्हणल्या, मनसेचा मिळालेला जाहीर पाठिंबा यांचा आम्हला नक्कीच फायदा होणार असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनापासून आभार मानते.त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि सर्व धर्मीय समाज घटकांची दिलेला पाठींबा यामुळे पर्वतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे.