पुणे- महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची तिकिटे मीच देणार आहे असे एकीकडे कार्यकर्त्यांना सांगताना दुसरीकडे पुणे शहर हे मला देशातील 1 नंबरचे शहर करून दाखवायचे आहे . त्यासाठी राष्ट्रवादीला बहुमत द्या अशी जनतेला विनंती येथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली .
धनकवडी येथील लोकनेते शरदचंद्र पवार बहु उद्देशीय भवनाचा लोकार्पण सोहळा आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . यावेळी बराच वेळ पवार यांनी जनतेशी दिलखुलास संवाद साधण्याचा प्रयत्न केला .त्यातील हि दुसरी व्हिडीओ क्लिप …. यानंतरची तिसरीही हमखास बघा … वारंवार बघा ऐका..