पुणे-कॉंग्रेस सोडून गेलेल्या नारायण राणेंना पुन्हा पक्षात आणण्यासाठी एका मोठ्या कॉंग्रेस नेत्याने मध्यस्थी केली असल्याची चर्चा आहे. राणे सध्या भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत त्यांना भाजपने जाहीरनामा समितीत स्थान दिले असले तरीही भाजप शिवसेना युती होऊ शकते.तसे झाले तर भाजप राणेंचा पत्ता कट करणार,हे उघड आहे.कारण राणे आणि शिवसेना यांचे हाडवैर आहे.त्यामुळे राणे कॉंग्रेसमध्ये परत येण्याचा विचार करू शकतात.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेसाठी कॉंग्रेसकडे राणेंइतका तुल्यबळ नेताच नाही.
नारायण राणेंनी सध्या भाजपशी जुळवून घेतले असले तरीही शिवसेनेशी युतीसाठी भाजप त्यांना वाऱ्यावर सोडून देण्याची शक्यता आहे.त्यामुळे राणे अस्वस्थ असून राणेंना पुन्हा आपल्याकडे घेऊन कोकणातून लोकसभेची उमेदवारी देवू शकतात अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.