चारकोप पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
मुंबई- मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार करत आहे. छत्रपतीच्या राज्यात टिपू सुलतानचे नाव क्रीडासंकुलनाला देणं ही महाराष्ट्रात दुर्दैवी बाब आहे. जोपर्यंत स्थानिक आमदार आणि काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केलेलं नामकारण बेकायदेशीर आहे असं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सांगत नाही तोपर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदारमंगल प्रभात लोढा यांनी आंदोलना दरम्यान दिला.
यावेळी महाराष्ट्रद्रोही टिपू सुलतानचे नाव महाराष्ट्रात हवेच कशाला असा सवाल आंदोलकांनी केला. तर महाराष्ट्रातल्या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप अशा वीरांचीच नावे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे.
तर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावर भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला आहे. ‘टिपूच्या नावाने नामकरण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आज धडक दिली. हिंदू द्रोह्यांचा उदो उदो सहन करणार नाही. पोलीस कारवाईची आम्हाला तमा नाही. दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही.’ असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
टिपूच्या नावाने नामकरण करणाऱ्यांविरुद्ध आम्ही आज धडक दिली. हिंदू द्रोह्यांचा उदो उदो सहन करणार नाही. पोलीस कारवाईची आम्हाला तमा नाही. दाढ्या कुरवळण्याचा प्रकार सहन करणार नाही.
मालाड-मालवणी येथील या क्रीडा मैदानाचे ‘वीर टिपू सुलतान क्रीडासंकुल’ असे नामकरण करण्याचा घाट महविकास आघाडी सरकारने घातला आहे. याचा मुंबई भाजपा कडून वारंवार निषेध करून देखील झोपलेल्या सरकारला जाग आली नाही. झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग यावी यासाठी मंगळवारी रात्री मुंबई भाजपा कडून आंदोलन करण्यात आले तरी देखील सरकारने कोणतेही दखल घेतली नाही. याचा तीव्र निषेध व्यक्त करण्याकरीता मुंबई भाजपा तर्फे चारकोप पोलिस स्टेशन बाहेर ठीय्या आंदोलन करण्यात आले . मुंबई भाजप कार्यकर्त्यांकडून चारकोप पोलिस स्टेशनबाहेर जोरदार सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .
त्यावेळी बोलताना मंगलजी म्हणाले की, मुंबईसह राज्यभरात काही मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण करण्याचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून केले जात आहेत. मालाड-मालवणी भागात मागील अनेक वर्षांपासून स्थानिक हिंदूंना त्या भागातून हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे हे पुन्हा एकदा क्रीडासंकुलनाच्या नावावरून सिद्ध झाले आहे.
मालाड मालवणी परिसरामध्ये टिपू सुलतान च्या नावाचे बोर्ड कसे काय लागले ? असा खोचक सवाल मंगलजी यांनी उपस्थित केला.
आंदोलनात मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, खासदार . गोपाल शेट्टी, मुंबई भाजपा उपाध्यक्ष पवन त्रिपाठी तसेच भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .