पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व निर्णय हे देशहितासाठी नसून राजकीय हितासाठी आहेत देश आणि पुढची पिढी घडविण्यासाठी नाहीत, केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी , नोटा बंदी सह पाकिस्तानी आतंकवाद यावर अविचारी निर्णय घेत आहेत असा घणाघाती आरोप आज माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केला .
आज पुणे शहर कॉंग्रेस ने आयोजित केलेल्या मेट्रो च्या प्रतीकात्मक भूमिपूजनाचा कार्यक्रम चव्हाण यांच्या हस्ते करून भाजपच्या या प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. रमेश बागवे,हर्षवर्धन पाटील ,विश्वजित कदम, अभय छाजेड,दीप्ती चौधरी,अविनाश बागवे, आबा बागुल,सतीश देसाई ,उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर , कमल व्यवहारे,सुधीर जानज्योत ,काका धर्मावत ,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .. कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती .
पहा आणि ऐका .. चव्हाण नेमके काय म्हणाले ….